esakal | Video : पतीसोबत पहाटेपासून ‘ती’ धावतेय रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Story of school bus driver Seema Waghmode

पतींनी प्रोत्साहन दिले म्हणूनच मी चालक बनले असे त्या सांगत आहेत. "तू ही गाडी चालवू शकते, बाहेर पडू शकते', असं पती नेहमी म्हणत. त्यामुळे मला प्रोत्साहन मिळत गेले, असं त्या "सकाळ'शी बोलताना म्हणाल्या. सुरवातीला थोडीशी भीती वाटायची तरी पण हळूहळू गाडी शिकून मनात आवड निर्माण झाली. 

Video : पतीसोबत पहाटेपासून ‘ती’ धावतेय रस्त्यावर

sakal_logo
By
सुस्मिता वडतीले

सोलापूर : महिला ही अबला आहे, असे म्हणण्याचे दिवस आता संपले. ती हिंमतीने पुरुषाच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे. आता वाहन चालवण्यात सुद्धा ती मागे नाही, हे शेळगी येथील एका 30 वर्षांच्या महिलेने सिद्ध करून दाखवलं आहे. पहाटे चार वाजल्यापासून घरातली सर्व कामे संपवून ती पुरुषांप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी रस्त्यावर धावते. भूतकाळाचा विचार न करता समृद्ध भविष्यकाळ निर्माण करण्यासाठी स्कूलबस चालवून ती पतीला घरगाडा हाकण्यासाठी मदत करत आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने घेतलेला त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा.
सीमा वाघमोडे या शेळगी भागात दयानंद महाविद्यालयाशेजारी राहतात. स्कूलबस चालक म्हटलं की, डोळ्यासमोर लगेच नाव येते ड्रायव्हर अंकलचे. पण आता सीमा वाघमोडे यांच्या रूपाने विद्यार्थ्यांच्या तोंडात ओ ड्रायव्हर अण्टी असे नाव येत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात स्कूलबस चालकांकडून अत्याचाराची घटना घडली. रिक्षावाल्याकडून विद्यार्थ्यांचा अत्याचार अशाही घटना आपण ऐकल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला. पण शाळेची बस पुरुषांऐवजी महिलांच्या हातात असेल तर पालकही खरंच निर्धास्त राहतात. त्याचप्रमाणे सीमा या मुलांची बस सुरक्षितपणे चालवण्याची जबाबदारी बजावत आहेत. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. 
वाघमोडे या दोन वर्षांपासून स्कूल बस चालवतात. शेळगी, मड्डीवस्ती, शेटेवस्ती, धोतरेवस्ती आणि गुजरवस्ती या वेगवेगळ्या भागांत त्यांची बस फिरते. त्यांच्याकडे 50 मुलांना शाळेत ने-आण करण्याची जबाबदारी आहे. महापालिकेच्या जयभवानी शाळेतील विद्यार्थी नेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांच्या मालकीच्या दोन बस आहेत. त्यांना त्यांच्या पतीची यासाठी साथ मिळत आहे. त्यांचे पती संतोष वाघमोडे हे बसचालक आहेत. 

पतींनी प्रोत्साहन दिले म्हणूनच मी चालक बनले असे त्या सांगत आहेत. "तू ही गाडी चालवू शकते, बाहेर पडू शकते', असं पती नेहमी म्हणत. त्यामुळे मला प्रोत्साहन मिळत गेले, असं त्या "सकाळ'शी बोलताना म्हणाल्या. सुरवातीला थोडीशी भीती वाटायची तरी पण हळूहळू गाडी शिकून मनात आवड निर्माण झाली. 
 
पतीसोबत स्कूलबस... 
आज पतीसोबत बसचालक म्हणून दोन वर्षांपासून काम करत आहे. त्यांना दोन मुले असून मुलगा समर्थ आणि मुलगी समृद्धी हे दोघे सध्या शालेय शिक्षण घेत आहेत. सीमा वाघमोडे यांनी सामाजिक व राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, यामुळे त्यांच्यातील आत्मविश्‍वास व धाडस सर्वांना प्रेरणादायी ठरणारे आहे. महिला कुठे कमी नाहीत हे या बस चालक सीमा वाघमोडे यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे.

loading image