0Police_Coronavirus.jpg
0Police_Coronavirus.jpg

कार्याला सलाम ! कुटुंबाची पर्वा न करता ते नागरिकांसाठी अहोरात्र रस्त्यांवर

Published on

सोलापूर : सामाजिक शांतता व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीला आळा बसवणे, सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे काम प्रामुख्याने करणारे पाच हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यांवर उभारुन विषाणूविरुध्दचा लढा यशस्वी करीत आहेत. दुसरीकडे बेशिस्त नागरिक तथा वाहनचालकांवर कठोर कारवाईदेखील करीत आहेत. 

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बेशिस्त वाहनचालक तथा नागरिकांवरील कारवाईतही सोलापूर अव्वल आहे. शहरात 19 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून आठ ठिकाणी बॉर्डर सिलिंग पॉईंटवर पोलिसांचा रात्रंदिवस बंदोबस्त आहे. बीट मार्शल, ड्रोन, कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या ठिकाणी विशेष बंदोबस्तासाठीही पोलिस कर्मचारी नियुक्‍त केले आहेत. तर जिल्हाअंतर्गत 40 ठिकाणी आणि आंतरजिल्हा 30 ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावला आहे. त्यासाठी होमगार्ड 400 तर विशेष पोलिस अधिकारी 400 नियुक्‍त केले आहेत. लॉकडाउनच्या काळात कोरोनाच्या भितीने घरात बसून असलेल्या नागरिकांसाठी स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता, कुटुंबातील सदस्य चिंतेत असतानाही पोलिस अहोरात्र रस्त्यांवर पहारा देत आहेत. दुसरीकडे ते अडचणीतील व्यक्‍तींना मदत करीत सामाजिक बांधिलकीही जोपासत आहेत. तर बेशिस्त नागरिकांवर कठोर कारवाई करीत आहेत. 

हैदराबाद रोडवरुन जातात दररोज तीन हजार वाहने 
मालवाहतूक वाहनांना परवानगी दिल्यानंतर हैदराबाद रोडवरुन सोलापूरसह राज्यातील अन्य ठिकाणी दररोज दोन हजार 700 ते तीन हजार वाहने ये-जा करीत असल्याची नोंद नाकाबंदीवरील पोलिसांकडे झाली आहे. लॉकडाउन काळात जीवनाश्‍यक वस्तूंचा तुटवडा होणार नाही, यासाठी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना नाकाबंदीवरील पोलिस कर्मचारी पाणी बाटली देत आहेत. तसेच त्यांची विचारपूस करीत सामाजिक बांधिलकी जोपासू लागले आहेत. पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी त्यांचे कौतूक केले. 

शहर-जिल्ह्यातील स्थिती 
एकूण पोलिस बंदोबस्त 
5,027 
वाहने जप्त 
8,823 
गुन्हे नोंद 
2,531 
व्यक्‍तींवरील कारवाई 
14,550 

आयुष्यातील संस्मरणीय अनुभव 
पोलिस खात्यात जॉईन झाल्यापासून सामाजिक सुरक्षितता व शांतता, लोकांमध्ये प्रबोधन तर आरोपींना शिक्षा अशीच कामे केली. मात्र, विषाणूविरुध्दच्या लढ्यात बहूतांश नागरिक स्वत:हून सहभागी झाले. तर स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस पोलिस अधिकारी, कर्मचारी रस्त्यांवर उतरले. देशातील प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी हे आव्हान स्वीकारले. कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरे जात देशातील जनतेची सुरक्षितता जपणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतूक आहे, असे गौरोद्गार पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी काढले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com