esakal | खाली सोळा मगरी अन्‌ वर दोन घारी मांज्यात फसलेल्या घारींची सुटका
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur

खाली सोळा मगरी अन्‌ वर दोन घारी ! मांज्यात फसलेल्या घारींची सुटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील महात्मा गांधी (Mahatma Gandhi) प्राणी संग्रहालयात एका झाडावर पंतगाच्या मांजात फसलेल्या घारींची (Eagle) निसर्गप्रेमींनी सुखरूप सुटका केली. विशेष म्हणजे या झाडाच्या खाली हौदात 16 मगरी (Crocodile) असताना निसर्गमित्रांची ही कामगिरी.

या ठिकाणी एक घार तर मांज्यात अडकून जमीनीपासून अवघ्या एक फुटावर लटकत होती. दुसरी घार तीस फुटावर अडकली. तेव्हा कर्मचारी शिवानंद शिंदे यांनी वन्यजीव प्रेमी संस्था सदस्यांना हा प्रकार कळवला. तेव्हा संस्था सदस्य गणेश तुपदोळे, अविनाश गुदपे, सिध्देश्वर किंदगिरी. कृष्ण जंगडेकर, सिद्धेश्वर मिसालेलू, तेजस म्हेत्रे, यश माडे, सुरेश करगुळे व मुकुंद शेटे घटनास्थळी पोहचले.

जमिनी लगतची घार प्रथम काढण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्मचारी शिंदे व गुदपे यांनी पिंजरा जाळीवर चढून बांबूच्या साह्याने घार पिंजऱ्याबाहेर खेचली. दुसरी घार ही झाडावर तीस फुट उंचावर मांजात फसलेली होती.

हेही वाचा: विराटला खाली ढकलून रोहित शर्मा Top 5मध्ये; जो रूट अव्वलस्थानी

तिच्या खाली पाण्यात 16 मगरी विश्रांती घेत बसल्या होत्या. तेव्हा महानगरपालिकेची बास्केट गाडी मागविण्यात आली. गाडी येताच बास्केटमध्ये बसून तीस फूट उंचीवर हे सदस्य घारीच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी बांबु हुकने घारीची मांज्यातून सुटका केली. घारीच्या पंखाना बराच इजा झाल्याचे दिसून आले.

तेव्हा ऍनिमल राहत संस्थेचे डॉ. आकाश जाधव यांनी दोन्ही घारीवर वैद्यकीय उपचार केले. जखम भरुन येण्यासाठी दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागणार असल्याने वन विभागाचे वनपाल शंकर कुताटे यांना घटनेची माहिती देण्यात आली. पुढील संगोपन वन विभागाच्या देखरेखीखाली वन्यजीवप्रेमी सदस्य सिध्देश्वर मिसालोलु करीत आहेत.

loading image
go to top