
सोलापूर : दररोज लाखो विद्यार्थी बसने शाळा, महाविद्यालयात ये-जा करतात. त्यांच्यासाठी हजारो फेऱ्या सुरू आहेत. परंतु, विविध कारणांनी काही फेऱ्या अचानक रद्द केल्या जातात, अशा तक्रारी विद्यार्थी व पालकांकडून येत आहेत. विशेषतः आदिवासी पाडे आणि दुर्गम भागात विद्यार्थ्यांना एकच बसफेरी उपलब्ध असल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे यापुढे प्रत्येक आगारप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शालेय फेरी कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.