भावी संशोधकांचा 'पेट'पूर्वीच तंटा ! परीक्षा न देण्याचा निवडला पर्याय अन्‌...

भावी संशोधकांचा 'पेट'पूर्वीच तंटा ! परीक्षा न देण्याचा निवडला पर्याय अन्‌...
भावी संशोधकांचा 'पेट'पूर्वीच तंटा ! परीक्षा न देण्याचा निवडला पर्याय अन्‌...
भावी संशोधकांचा 'पेट'पूर्वीच तंटा ! परीक्षा न देण्याचा निवडला पर्याय अन्‌...
Summary

"पीएचडी'साठी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडे 644 जागांसाठी दोन हजार 700 अर्ज आले. त्या विद्यार्थ्यांची मंगळवारी "पेट' परीक्षा झाली.

सोलापूर : "पीएचडी'साठी (PhD) पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडे (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) 644 जागांसाठी दोन हजार 700 अर्ज आले. त्या विद्यार्थ्यांची मंगळवारी "पेट' (PET) परीक्षा झाली. तत्पूर्वी, भावी संशोधकांना अर्जदेखील व्यवस्थित भरता आला नसल्याने परीक्षेपूर्वीच गोंधळ उडाला. सेट-नेट (SET-NET) परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना "पेट'मधून सवलत मिळते. मात्र, त्यांचा अर्ज पाहून सेट-नेट न झालेल्यांनीही परीक्षा देणार नसल्याचा पर्याय निवडला. तासाभराच्या गोंधळानंतर विद्यापीठाने त्यांना परीक्षेची संधी दिली.

भावी संशोधकांचा 'पेट'पूर्वीच तंटा ! परीक्षा न देण्याचा निवडला पर्याय अन्‌...
मंदिरे बंद ठेवण्यावरून फडणवीसांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा! म्हणाले...

पारंपरिक शिक्षणाला व्यावसायिक अभ्यासक्रमांची जोड देऊन उद्योजक निर्मितीकडे विद्यापीठाचा कल आहे. संशोधनात्मक शिक्षणालाही पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने महत्त्व दिले आहे. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांतून संशोधन व्हावे या हेतूने यंदा 644 जागांसाठी विद्यापीठाने "पेट' परीक्षा घेतली. 10 ऑगस्टऐवजी 13 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत विद्यापीठाने दिली. सेट-नेट उत्तीर्ण झालेल्या जवळपास साडेतीनशे विद्यार्थ्यांनीही "पेट'साठी अर्ज केले. त्यांचे सेट-नेट झाल्याने त्यांच्यासाठी "पेट' बंधनकारक नाही. त्यामुळे त्यांनी ती परीक्षा देणार नाही, असा पर्याय निवडला. त्यांचे पाहून सेट-नेट उत्तीर्ण नसलेल्या तब्बल चारशे विद्यार्थ्यांनी "पेट' देणार नाही, असा पर्याय निवडला. त्यांची मंगळवारी परीक्षा झाली, परंतु तासभर होऊनही परीक्षेची लिंक व पासवर्ड न मिळाल्याने ते संभ्रमात पडले. त्यांनी विद्यापीठाशी संपर्क केला. त्या वेळी तुम्ही परीक्षा देणार नाही, असा पर्याय निवडल्याने तुम्हाला लिंक आली नसल्याचे उत्तर मिळाले. त्या वेळी त्यांनी गोंधळ सुरू केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विद्यापीठाने सेट-नेट उत्तीर्ण झालेल्यांसह सर्वांनाच लिंक पाठविली आणि परीक्षा देणे बंधनकारक केले. भावी संशोधक म्हणून अर्ज केलेल्यांना परीक्षेचा अर्ज करता येत नसल्याबद्दल विद्यापीठाने नाराजी व्यक्‍त केली.

सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना "पेट' परीक्षेची सवलत मिळते, परंतु त्यांच्याकडून ऑप्शन फॉर्म भरून पेट देणार की नाही, असे लिहून घेतले जाते. त्यांचे पाहून काही विद्यार्थ्यांनी सेट-नेट नसतानाही परीक्षा देणार नाही, असा पर्याय निवडला. परीक्षेची लिंक येत नसल्यानंतर त्यांनी गोंधळ सुरू केला. विद्यार्थी हिताचा निर्णय घेत त्यांना विद्यापीठाने परीक्षेची संधी दिली.

- डॉ. विकास कदम, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

भावी संशोधकांचा 'पेट'पूर्वीच तंटा ! परीक्षा न देण्याचा निवडला पर्याय अन्‌...
खासगी शाळांकडून शिक्षणमंत्र्यांच्या फी माफीच्या आदेशाला बगल !

तासिका तत्त्वावरील प्राध्यापक गाईड

पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शिकविण्याचा पाच वर्षांचा अनुभव असलेल्यांची "पीएचडी'चा मार्गदर्शक म्हणून निवड केली जाते. सहाय्यक प्राध्यापकाकडे चार विद्यार्थी, असोसिएट प्राध्यापकाकडे सहा तर प्रोफेसरकडे प्रत्येकी आठ विद्यार्थी दिले जातात. सेवानिवृत्तीला दोन वर्षे राहिलेल्या प्राध्यापकाची गाईड म्हणून निवड केली जात नाही. जवळपास दोनशे मार्गदर्शक प्राध्यापक असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. परंतु, त्यात तासिका तत्त्वावरील प्राध्यापकही असल्याचे बोलले जात आहे. शासन स्तरावरून रिक्‍त पदे भरली जात नसल्याने ही अवस्था झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com