esakal | पाच तालुक्‍यांतील विद्यार्थी अद्याप पुस्तकांविना ! 22 लाखांपैकी 12 लाख पुस्तकांची प्रतीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

पाच तालुक्‍यांतील विद्यार्थी अद्याप पुस्तकांविना !

पाच तालुक्‍यांतील विद्यार्थी अद्याप पुस्तकांविना !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

यंदा विद्यार्थ्यांना पुस्तकांची अद्याप प्रतीक्षा कायम आहे.

सोलापूर : पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना बालभारतीकडून (Balbharati) दरवर्षी पुस्तके (Text Books) मिळतात. मागील वर्षी 30 जूनपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली होती. मात्र, यंदा विद्यार्थ्यांना पुस्तकांची अद्याप प्रतीक्षा कायम आहे. सोलापूर जिल्ह्यातील सव्वादोन लाख विद्यार्थ्यांसाठी 22 लाख पुस्तकांची गरज आहे. परंतु, त्यातील दहा लाख पुस्तके प्राप्त झाली असून, पाच तालुक्‍यांतील मुलांना एकही पुस्तक मिळाले नसल्याचे समोर आले आहे. (Students from five talukas of the district have not yet received the text books-ssd73)

हेही वाचा: समाधान, तू नावाप्रमाणेच समाधानी दिसत आहेस - उद्धव ठाकरे

कोरोनामुळे (Covid-19) ऑफलाइन शाळा बंद आहेत. सध्या आठवी ते बारावीपर्यंतचे ऑफलाइन वर्ग सुरू असून उर्वरित मुलांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. मात्र, जिल्ह्यातील तब्बल साडेपाच लाख विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा अध्ययनस्तर सुधारण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. स्वाध्यायमाला, सेतू अभ्यासक्रम, दीक्षा ऍप, सह्याद्री चित्रवाहिनीच्या माध्यमातूनही मुलांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. मात्र, हातावरील पोट असलेल्या जिल्ह्यातील अंदाजित 40 टक्‍के पालकांपर्यंत हे उपक्रम पोचलेच नाहीत अथवा कमी- अधिक प्रमाणात पोचले आहेत. त्या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाल्यास त्यांची शिक्षक व शिक्षण (शाळा) यातील दरी कमी होण्यास मदत होणार आहे. परंतु, बालभारतीकडून आतापर्यंत मंगळवेढा, माळशिरस, करमाळा, अक्‍कलकोट, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापुरातील काही मुलांना पुस्तके मिळाली आहेत तर बार्शी, मोहोळ, पंढरपूर, माढा, सांगोला या तालुक्‍यांतील एकाही मुलाला पुस्तके मिळाली नाहीत, असे प्राथमिक शिक्षण विभागाने (Department of Primary Education) सांगितले.

हेही वाचा: चिमुकल्यांची ऑगस्टमध्ये ऑफलाइन शाळा? आपत्ती व्यवस्थापनला प्रस्ताव

जिल्ह्यासाठी यंदा 22 लाख पुस्तके बालभारतीकडून येणे अपेक्षित आहे. आतापर्यंत दहा-बारा लाखांपर्यंत पुस्तके मिळाली आहेत. तर पाच तालुक्‍यांना पुस्तके मिळालेली नाहीत. आगामी काही दिवसांत पुस्तके मिळतील, अशी आशा आहे.

- संजयकुमार राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

बालभारतीकडून थेट पुस्तकांचे वितरण

दरवर्षी बालभारतीकडून जिल्ह्याला येणारी पुस्तके तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे दिली जातात. त्यानंतर तेथून तालुक्‍यातील प्रत्येक केंद्र शाळेला पुस्तके पाठविली जातात. केंद्राअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक शाळेमधील विद्यार्थ्यांना तेथून पुस्तकांचे वाटप होते. मात्र, यंदा विलंब झाल्याने बालभारतीकडून थेट तालुकास्तरावर पुस्तके येत आहेत. त्यानंतर तेथून बालभारतीच्या यंत्रणेकडूनच केंद्र शाळांना पाठवून प्रत्येक शाळेत पुस्तके पोच केली जात आहेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी वाटप केलेल्या पुस्तकांचा रिपोर्ट घेणे, त्यानंतर झालेल्या खर्चास मंजुरी घेऊन बालभारतीकडे पाठवायचा, त्यानंतर पैसे मिळतात. या प्रक्रियेला साधारणपणे आठ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे हा प्रकार यंदा बंद करण्यात आला आहे.

loading image