PM E-Vidya : ‘पीएम ई-विद्या’वर बारावीपर्यंतचा अभ्यास; नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सुरवात

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पीएम ई - विद्या वाहिनी सुरू करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रासाठी पाच डीटीएच टीव्ही वाहिनी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
Study material upto 12th on PM e-Vidya new National Education Policy multi code access
Study material upto 12th on PM e-Vidya new National Education Policy multi code accessSakal

सोलापूर : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पीएम ई - विद्या वाहिनी सुरू करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रासाठी पाच डीटीएच टीव्ही वाहिनी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यासाठी ई साहित्य निर्मिती सुरू करण्यात आली आहे. या वाहिनीवर येत्या ऑगस्टपासून पहिली ते बारावी अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याला कधीही व कुठेही दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात डिजिटल शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. भारत जागतिक महासत्ता व ज्ञान महासत्ता बनविण्याच्या हेतूने गुणवत्तापूर्ण शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे. त्यासाठी पंतप्रधान ई विद्या योजना राबविण्यात येत आहे.

त्यानुसार शिक्षणात तंत्रज्ञानाची भूमिका सक्षम करण्यासाठी पीएमई - विद्या वाहिनी सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रेडिओ तंत्रज्ञानासह डिजिटल ऑनलाइन शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या वाहिनीला एक वर्ग एक वाहिनी म्हणून घोषित केले आहे. या योजनेतून १२ डीटीएच टीव्ही वाहिन्या सुरू करण्यात आल्या आहेत. दर्जेदार शैक्षणिक ई सामग्री उपलब्ध करून देणे हा यामागचा हेतू आहे. सध्या देशभरात एनसीईआरटीच्या माध्यमातून २०० डीटीएट टीव्ही वाहिन्यांद्वारे पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषांमधून शिक्षण देण्यात येत आहे. यात महाराष्ट्रासाठी पाच वाहिन्या सुरू केल्या आहेत.

दृष्टिहीन, श्रवणदोषांसाठीही विशेष ई सामग्री

पीएमई विद्या वाहिनीवरील ई साहित्य निर्मितीचे काम पुण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून सुरू आहे. त्यासाठी राज्यातील संसाधन व्यक्ती योगदान देत आहेत. पहिली ते बारावीपर्यंतच्या प्रत्येक वर्गासाठी एक नियोजित टीव्ही वाहिनी राहील. दृष्टिहीन व श्रवणदोषांसाठीही विशेष ई सामग्री तयार करण्यात येणार आहे.

२५ कोटींहून अधिक मुलांना लाभ

गेल्या जुलैपासून नववी ते बारावीचे ई साहित्य विद्यार्थ्यांसाठी प्रक्षेपित केले जात आहे. डिश टीव्ही प्रक्षेपण वाहिनी क्रमांक २११३ ते २११७ अशा पाच वाहिनी महाराष्ट्रासाठी सुरू केल्या आहेत. याचा राज्यातील २५ कोटींहून अधिक मुलांना लाभ होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com