

सोलापूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या विविध कारवायांमध्ये किती वाळू जप्त करण्यात आली, याची माहिती संकलित करण्यात येत आहे. महसूल व पोलिसांच्या कारवाईत ६२७ ब्रास वाळू ताब्यात घेण्यात आली आहे. त्यातील १६५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून उर्वरित वाळू जप्त करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.