
उ. सोलापूर : राज्यातील काही संस्थांनी चुकीची आकडेवारी सादर करत अनुदान लाटण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे राज्यातील इतर दूध उत्पादकांचे जवळपास ४२ कोटी रुपये अनुदान थकले आहे. सोलापूर जिल्ह्यातील तपासणी केलेल्या ६९ संस्थापैकी २९ संस्थांच्या संकलनात गडबड आढळून आली आहे.