
पंढरपूर : वाखरी ते पंढरपूर पालखीमार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. अवघ्या दोन महिन्यांतच वाखरी येथे पालखीमार्गाला तडे गेले आहेत. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.