esakal | माळशिरसच्या सिद्धी डोळसचा फॅशन डिझाईनमध्ये ठसा ! मनिकर्णिका चित्रपटात कंगनासाठी केले ड्रेस डिझाईन 
sakal

बोलून बातमी शोधा

Siddhi Dolas

अभिनेत्री कंगना राणावतच्या गाजलेल्या "मनिकर्णिका' चित्रपटात सिद्धी डोळस यांनी कंगनाच्या ड्रेस डिझाईनची जबाबदारी पार पाडली. आंतराष्ट्रीय पातळीवरील फॅशन डिझायनगर नीता लुल्ला यांच्याकडे क्रिएटिव्ह डायरेक्‍टर म्हणूनही सिद्धी यांनी काम केले आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वावर त्या आपल्या कार्याचा व कल्पनाशक्तीचा ठसा उमटवत आहेत. अभिनेता अक्षय कुमारचा "बेलबॉटम' चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटासाठी सिद्धी यांनी ऍसिस्टंट फोटोग्राफर म्हणूनही काम पाहिले आहे. 

माळशिरसच्या सिद्धी डोळसचा फॅशन डिझाईनमध्ये ठसा ! मनिकर्णिका चित्रपटात कंगनासाठी केले ड्रेस डिझाईन 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : या अभिनेत्रीची ती साडी खूप भारी आहे. त्या अभिनेत्याचा तो ड्रेस खूप भारी आहे. मला तसलीच साडी आणि तसलाच ड्रेस हवा आहे. चित्रपट पाहून अनेकांच्या मनातील जागी झालेली फॅशन डिझाईन हा सर्वांच्याच आवडीचा विषय. माळशिरसचे आमदार कै. हनुमंतराव डोळस यांची कन्या सिद्धी डोळस सध्या फॅशन डिझाईनचे क्षेत्र गाजवत आहे. सोलापूरची ही कन्या फॅशन डिझाईनमध्ये करिअर घडवत आहे, सोलापूरचे नाव झळकवत आहे. 

कै. डोळस यांना संकल्प नावाचा मुलगा आणि सिद्धी नावाची मुलगी आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून संकल्प राजकारणात करिअर घडवत आहेत. सिद्धी या फॅशन डिझाईनमध्ये करिअर करत आहेत. मुंबईतील उषा प्रवीण गांधी कॉलेज आर्टस्‌, सायन्स अँड कॉमर्समधून सिद्धी यांनी बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी घेतली. त्यानंतर आंतराष्ट्रीय पातळीवरील मासिकांमध्ये इंटरर्नशिप पूर्ण केली. सध्या त्या लंडन येथे लंडन कॉलेज ऑफ फॅशनमध्ये फॅशन अँड मीडियाचा पदव्युत्तर पदवीचा (एमए) अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. 

अभिनेत्री कंगना राणावतच्या गाजलेल्या "मनिकर्णिका' चित्रपटात सिद्धी यांनी कंगनाच्या ड्रेस डिझाईनची जबाबदारी पार पाडली. आंतराष्ट्रीय पातळीवरील फॅशन डिझायनगर नीता लुल्ला यांच्याकडे क्रिएटिव्ह डायरेक्‍टर म्हणूनही सिद्धी यांनी काम केले आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वावर त्या आपल्या कार्याचा व कल्पनाशक्तीचा ठसा उमटवत आहेत. अभिनेता अक्षय कुमारचा "बेलबॉटम' चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटासाठी सिद्धी यांनी ऍसिस्टंट फोटोग्राफर म्हणूनही काम पाहिले आहे. 

फॅशन डिझाईन, फॅशन मीडिया हे माझे आवडते क्षेत्र आहे. या क्षेत्रात जाण्यासाठी माझ्या वडिलांनी व परिवाराने मला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. या क्षेत्रात मला माझ्या स्वत:चा ब्रॅंड तयार करायचा आहे. 
- सिद्धी डोळस,
फॅशन डिझायनर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image