वडिलांचं 'ते' वाक्‍यच ठरलं टर्निंग पॉइंट! अन्‌ घेतली यशस्वी झेप!

वडिलांचं 'ते' वाक्‍यच ठरलं टर्निंग पॉइंट... अन्‌ नैराश्‍येतून घेतली यशस्वी झेप!
आदित्य सुरेखा अजिनाथ शेंडे
आदित्य सुरेखा अजिनाथ शेंडेSakal
Summary

ही प्रेरणादायी यशोगाथा आहे माढा तालुक्‍यातील निमगाव (टें.) येथील आदित्य सुरेखा अजिनाथ शेंडे यांची.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : स्पर्धा परीक्षेत (Competitive Examinations) सातत्याने पदरी पडणाऱ्या अपयशामुळे मानसिक खच्चीकरण होऊन नैराश्‍य येत होते. खासगी नोकरी (Jobs) करण्याच्या मानसिकेत असतानाच, वडिलांनी दिलेले प्रबलन अन्‌ सोबतीला सातत्यपूर्ण प्रयत्नांची पराकाष्ठा याच्या जोरावर शेवटचा प्रयत्न म्हणून आत्मविश्वासाने परीक्षा दिली आणि तहसीलदारपदी (Tehsildar) झेप घेतलीच. ही प्रेरणादायी यशोगाथा आहे माढा (Madha) तालुक्‍यातील निमगाव (टें.) येथील आदित्य सुरेखा अजिनाथ शेंडे (Aditya Surekha Ajinath Shende) यांची. (Success story of Aditya Shende who became Tehsildar due to continuous efforts)

आदित्य सुरेखा अजिनाथ शेंडे
प्रयोगशील शिक्षकांचे प्रतिकूल परिस्थितीतही अतुलनीय योगदान!

आई- वडील दोघेही शिक्षक (Teacher) असल्यामुळे आदित्य यांचे प्राथमिक शिक्षण अकलूज (Akluj) व निमगाव येथे झाले. गावात सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा नसल्याने, नेवासा (जिल्हा अहमदनगर) येथील सैनिकी शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर दहावीपर्यंतचे शिक्षण इंदापूरमधून पूर्ण केले. येथे शिक्षण घेत असताना, देवकर या शिक्षकामुळे स्पर्धा परीक्षांची ओळख झाली. त्यांच्यामुळे आदित्य यांना रोज वृत्तपत्र वाचायची सवय लागली. ते मोकळ्या तासात जगात नक्की काय चाललंय याची माहिती करून देत असत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचे आकर्षण वाढले. पुढे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान शाखेतून व बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षा करायची होती म्हणून कला शाखेला प्रवेश घ्यावा असा मानस होता. परंतु स्पर्धा परीक्षेत जर अपयश आले तर आपल्याकडे हक्काची नोकरी असावी, ज्याला आपण 'प्लॅन बी' म्हणतो तो असावा म्हणून नांदेड (Nanded) येथील शासकीय महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असताना अभ्यास तर सुरू होताच, पण त्याशिवाय 'एनएनएस'च्या (NNS) माध्यमातून सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग होता. त्याचबरोबर पोलिस मित्र संघटनेत देखील सहभागी होते. त्यामुळे प्रशासनाचा जवळचा संबंध आला आणि आपण या क्षेत्राकडे यावं, असं आदित्य यांनी मनाशी अधिक पक्कं केलं.

कॉलेज संपल्यावर 2016 साली स्पर्धा परीक्षेचा पूर्ण वेळ अभ्यास करण्यासाठी आदित्य यांनी पुणे (Pune) गाठलं. वरिष्ठ मित्रांचं मार्गदर्शन असल्यामुळे, कोणताही क्‍लास न लावता अभ्यास करायचं ठरवलं. 2016 च्या पहिल्या प्रयत्नात सीसॅट विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपयश आलं. पुढे 2017 च्या प्रयत्नात अगोदरच्या चुका मान्य करून वरिष्ठ मित्रांकडून मार्गदर्शन घेऊन अभ्यास केला. यावेळी मात्र थेट मुलाखतीपर्यंत जाऊन पोहोचले. परंतु यावेळी मुख्य आणि मुलाखत या टप्प्यावर तयारी कमी पडली आणि याचा परिणाम म्हणजे त्यांचं अंतिम यादीत नाव आलं नाही. यादरम्यान थोडंसं नैराश्‍य यायला सुरुवात झाली होती. परंतु अभ्यास तर पुढे करणे गरजेचे होते. 2018 साली ते यूपीएससी (UPSC) आणि एमपीएससी (MPSC) या दोन्ही परीक्षांच्या मुख्य परीक्षा दिल्या. परंतु दोन्ही परीक्षांचा ताण आल्यामुळे, दोन्ही परीक्षेत अनुत्तीर्ण झाले. आता मात्र त्यांना नैराश्‍याने पूर्ण घेरलं होतं. घरी फोन केला आणि वडिलांना तडक सांगितलं की, खासगी क्षेत्रात नोकरी शोधण्याचा विचार करतोय. अगोदर मुलाखतीपर्यंत मजल मारल्याने आदित्य यांच्या वडिलांना विश्वास होता. त्यामुळे त्यांनी आदित्य यांना एका वाक्‍यात समजावलं की, 'राजा, एक कुस्ती हरल्यावर कसलेला पैलवान आखाडा सोडून पळून जात नाही, तर तो पुन्हा आपल्या चुकांवर काम करून परत रिंगणात उतरतो आणि कुस्ती मारून नेतो. मी सांगतो म्हणून तू 2019 चा शेवटचा प्रयत्न कर, नाही झालं तर तू तुझा निर्णय घ्यायला मोकळा.'

आदित्य सुरेखा अजिनाथ शेंडे
मकर संक्रांतीपूर्वी शाळा होणार बंद? 7 दिवसांत वाढले दीड लाख रुग्ण

वडिलांच्या या प्रेरणेमुळे आदित्य यांनी मन परत घट्ट केलं. जिद्दीला प्रयत्नांची जोड देऊन आत्मविश्वासाने पुन्हा नव्या उमेदीने परीक्षेला सामोरे गेले अन्‌ अखेर राज्यसेवेतून तहसीलदारपदी त्यांची निवड झाली. या यशानंतर आदित्य यांना एक गोष्ट आयुष्यभरासाठी कळाली, ती म्हणजे मानसिक ताण आल्यावर तो आपल्या आई-वडिलांना दिलखुलासपणे बोलून दाखवला पाहिजे, बोलल्याने मन हलकं होतं आणि ताण निवळतो. जर वडिलांकडे बोलून दाखवलं नसतं तर कदाचित खासगी नोकरी करत राहिले असते. ताणतणावाच्या काळात कुटुंब हेच आपलं पहिलं आणि अंतिम आधारवड असतं हे युवकांनी ध्यानात घेतलं पाहिजे, असा संदेश आदित्य यांनी युवकांना दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com