अकरावी सायन्सला प्रवेश मिळाला नाही, तरीही प्रतीक्षा बनली अधिकारी! | Success Story | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावी सायन्सला प्रवेश मिळाला नाही, तरीही प्रतीक्षा बनली अधिकारी!
अकरावी सायन्सला प्रवेश मिळाला नाही, तरीही प्रतीक्षा बनली अधिकारी!

अकरावी सायन्सला प्रवेश मिळाला नाही, तरीही प्रतीक्षा बनली अधिकारी!

सोलापूर : विजयपूर रोडवरील प्रतीक्षा सुभाष नारायणकर (Pratiksha Narayankar) हिने आई-वडिलांनी तिच्या बालवयात पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission - MPSC) परीक्षेत तिने आरटीओच्या (RTO) वाहतूक निरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. कौटुंबिक परिस्थिती बेताची, आई घरकाम करत होती. वडील सुभाष हे कलाशिक्षक (Art Teacher), परंतु पगार जेमतेमच. एक मुलगा आणि पाच मुलींचे कुटुंब सांभाळताना त्यांची पंचाईत व्हायची. पगारातून त्यांना कुटुंब चालविणे कठीण जात होते. त्यामुळे त्यांनी शिक्षकाची (Teacher) नोकरी सांभाळत घड्याळ दुरुस्ती, पेंटिंग, टिव्ही, मिक्‍सर, कुकर दुरुस्ती, लग्नपत्रिका, बॅनर छपाई करून मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवला. त्यांनी आपल्या मुलांनी मोठे अधिकारी व्हावे, असे स्वप्न पाहिले. त्यानुसार त्यांनी पाच मुली व एका मुलालाही उच्चशिक्षित केले. प्रसंगी त्यांनी घरखर्च कमी केला, पण शिक्षणात मुलांना काहीच कमी पडू दिले नाही. मुलींकडे लक्ष देत असतानाही त्यांनी मुलालाही आयटी इंजिनिअर (IT Engineer) बनविले. (Success story of Pratiksha Narayankar who reached the post of officer)

हेही वाचा: ३ ते १२ जानेवारी दरम्यान ''जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा'' अभियान

तत्पूर्वी, प्रतीक्षाने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची (Mechanical Engineering) पदवी घेऊन खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर जॉब (Job) मिळविला. हा प्रवास करत असतानाच प्रतीक्षाला 2011 मध्ये आरटीओच्या स्पर्धा परीक्षेत (Competitive Exam) यश मिळाले, परंतु तिला पुढील शिक्षण घ्यायचे होते म्हणून तिने संधी नाकारली. त्यानंतर जलसंपदा विभागात (Water Resources Department) तिला ज्युनिअर अभियंता (Junior Engineer) म्हणूनही संधी मिळाली. तत्पूर्वी, आयटीआय करताना तिला लोको पायलट (Loco Pilot) म्हणूनही संधी मिळाली होती. तरीही, प्रतीक्षाने आई-वडिलांचे स्वप्न उराशी बाळगून आत्मविश्‍वास कमी होऊ दिला नाही. मिळालेली संधी डावलून उच्च शिक्षण घेताना प्रतीक्षाने आई-वडिलांच्या स्वप्नाला गवसणी घातलीच. 2017 मध्ये तिने पुन्हा स्पर्धा परीक्षा दिली आणि त्याचा निकाल नुकताच डिसेंबर 2021 मध्ये जाहीर झाला. त्यात प्रतीक्षाने आई-वडिलांच्या स्वप्नाची 'प्रतीक्षा' सत्यात उतरविली.

हेही वाचा: हेल्मेट नसल्यास परवाना होणार निलंबित! रिक्षाचालकांना गणवेशाचे बंधन

अकरावी 'सायन्स'ला प्रवेश न मिळाल्याची खंत

उमाबाई श्राविका प्रशालेतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रतीक्षाला संगमेश्‍वर महाविद्यालयात विज्ञान शाखेला (Science) प्रवेश घ्यायचा होता. परंतु, कौटुंबिक कारणामुळे तिला तो प्रवेश घेता आला नाही. त्यानंतर तिने आयटीआयतील (ITI) मोटार मेकॅनिकल (Motor Mechanical) या शाखेला प्रवेश घेतला. आयटीआय पूर्ण झाल्यानंतर प्रतीक्षाने डिप्लोमाला (Diploma) प्रवेश घेतला आणि शिक्षणाची पुढील वाटचाल सुरूच ठेवली. डिप्लोमामध्ये प्रथम श्रेणीत यश प्राप्त केल्यानंतर तिने पुण्यातील (Pune) (लोहगाव) डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात (D. Y. Patil Engineering College, Pune) पदवीचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, तिने सामाजिक उपक्रम, विविध खेळ, वक्‍तृत्व स्पर्धेतही सहभाग नोंदविला. क्रिकेट (Cricket), व्हॉलिबॉल, बुद्धिबळ स्पर्धेत ती राज्यस्तरावर पोचली. प्रतीक्षाच्या यशानंतर अनेक स्तरावरून तिचे कौतुक होऊ लागले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top