
सोलापूर : विडी घरकुल भागातील रहिवासी अंबादास बिच्छल यांचा आठ वर्षीय मुलगा मयुरेश याच्या हृदयास असलेल्या छिद्राच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मोलाची मदत झाली. मुंबईतील नामवंत रूग्णालयात बुधवारी, ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या तत्परतेमुळे मयुरेशला नवजीवन मिळाल्याने अंबादास बिछल यांनी सर्वाचे आभार मानले आहे.