

Solapur Sugar Sector Crisis: Cane Bills Still Unpaid After Season
sakal
-संदीप गायकवाड
उ.सोलापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. दहा ते पंधरा कारखान्यांचा हंगाम बंद झाला तर उर्वरित कारखान्यांचा पट्टा पडण्याची शक्यता आहे. मात्र कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम मोठ्या प्रमाणात थकविल्यामुळे ऊस उत्पादक हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील कारखानदारांनी जवळपास पाचशे कोटी रुपयांची उसाची रक्कम थकविली आहे.