Siddheshwar Factory : कामगारांची पोटं भरणारी 'चिमणी' पुन्हा उभी राहणार; भारतीय महासंघ करणार मदत

सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी संदर्भात काही तांत्रिक मुद्दे मांडले गेले.
Siddheshwar Sugar Factory Chimney
Siddheshwar Sugar Factory Chimneyesakal
Summary

सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामाच्या घटनेवर राष्ट्रीय सहकारी साखर संघ निश्चितपणे विचार करेल.

सोलापूर : सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी (Siddheshwar Sugar Factory Chimney) पाडल्यानंतर फनेल झोन बाहेरील चिमणी उभारणीची शक्यता, कारखाना सुरु करण्यासाठी तांत्रिक पर्यायांची बाजू या सारख्या अनेक मुद्द्यांवर तज्ज्ञांचे लक्ष केंद्रित केले गेले आहे.

हंगाम सुरु होण्यापूर्वी म्हणजे चार महिन्यात चिमणी उभारणीचा योग्य तांत्रिक पर्याय निश्चित होऊन ती उभारणे हे महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी सहकारी साखर कारखान्याच्या शिखर संघटनेने (भारतीय साखर महासंघ) मदत करण्याची (Sugar Federation of India) तयारी दर्शवली आहे.

Siddheshwar Sugar Factory Chimney
चिंताजनक! 'या' प्रमुख धरणांतील पाणी पातळी खालावतेय; पाऊस लांबल्यास भीषण टंचाईची भीती

सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी संदर्भात काही तांत्रिक मुद्दे मांडले गेले. एकतर विमानाचा फनेल झोन (विमानाचे टेक ऑफ व उतरण्याचा पट्टा) वगळता चिमणी इतर बाजूला हलवावी, असा अहवाल डीजीसीएने काही वर्षापूर्वी दिला होता. त्यामध्ये चिमणी उभारण्यासाठी नजीकची पर्यायी स्थळे सुचवली होती.

त्या पर्यायी स्थळांचा पुन्हा विचार करुन चिमणी उभारली जाऊ शकते. मुख्य म्हणजे विमानाचा फनेल झोन हा धावपट्टीपासून पुढे जात असताना अधिक उंच होत जातो. त्यामुळे कमाल अंतरावर त्याची उंची चिमणीपेक्षा देखील अधिक असू शकते, असे सांगितले जाते. तांत्रिक पर्यायाचा शोध घेत असताना अहवालानुसार नव्या पर्यायी जागांचा शोध घेणे, चिमणीची उंची या सारख्या तांत्रिक मुद्द्यांवर अभ्यास करण्याची गरज आहे.

Siddheshwar Sugar Factory Chimney
Flood News : यंदाही सातारा, सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसणार; कोट्यवधींचं होणार नुकसान?

काही ठळक नोंदी

  • डीजीसीएने दिलेल्या पर्यायी जागांवर चिमणी उभारणीच्या पर्यायांचा अभ्यास.

  • राष्ट्रीय सहकारी साखर संघाने तांत्रिक पर्यायासाठी मदतीची तयारी.

  • पर्यायी जागेत चिमणी उभारण्यासाठी कालावधी कमी करण्याचा प्रयत्न महत्त्वाचा.

Siddheshwar Sugar Factory Chimney
Suresh Khade : खून, दरोडा, चोरी, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे सांगलीत घडताहेत; पालकमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामाच्या घटनेवर राष्ट्रीय सहकारी साखर संघ निश्चितपणे विचार करेल. संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात मुद्दा मांडला जाईल. तसेच कारखान्याला योग्य ती मदत करुन लवकरात लवकर हंगामासाठी काय करता येईल याचा विचार केला जाईल.

- जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, भारतीय साखर महासंघ, दिल्ली

Siddheshwar Sugar Factory Chimney
Satara : शिवस्मारकाला धक्का न लावता पोवई नाक्यावर बाळासाहेबांचं स्‍मारक होणारच; वादावर देसाईंची स्पष्ट भूमिका

विमानसेवेसाठी चिमणी पाडकामाची ही घटना दुर्दैवी म्हटली पाहिजे. पण, कारखाना सुरु करण्यासाठी नेमके कमी कालावधीत काय करता येईल याचा विचार व्हायला हवा. चिमणीची उंची कमी करून प्रश्न सुटला असता का याबाबत नेमके काय झाले ते समजून घ्यावे लागेल. कारखान्यास योग्य ती मदत केली जाईल.

- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, भारतीय साखर महासंघ, दिल्ली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com