FRP Mandate for Khandsari Units Explained
esakal
सोलापूर : केंद्र सरकारने ऊस नियंत्रण आदेश १९६६ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा सुचवणारा मसुदा जाहीर केल्यानंतर, साखर उद्योग आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चेला उधाण आले (sugarcane control order 1966 amendment details) आहे. सध्याच्या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यानेच कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या ऊसबिलांची थकबाकी वाढत आहे. त्यामुळे या सुधारणा ‘लॉलीपॉप’ ठरणार नाहीत ना, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.