

Sugarcane Transport Safety
esakal
सोलापूर: ऊस गाळप हंगाम सुरू होताच रस्त्यांवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रेलर, बैलगाडी, अंगद-जुगाड आणि ट्रकची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या वाहनांमुळे विशेषतः रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांवर रिफ्लेक्टर बोर्ड व रिफ्लेक्टिव्ह टेप बंधनकारक केली आहे. याबाबत साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांना निर्देश दिले आहेत.