स्मशानभूमीत आंदोलन करून राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा | Agitation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मशानभूमीत आंदोलन करून राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा

स्मशानभूमीत आंदोलन करून राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा

sakal_logo
By
राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) - सध्या सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा म्हणून शिरापुर ता मोहोळ येथील शेतकरी अनिल आबाजी पाटील यांनी त्यांच्याच गावात असलेल्या स्मशानभूमीत शनिवार ता 13 पासुन आंदोलन सुरू केले आहे. तशा आशयाचे लेखी निवेदन मोहोळच्या तहसीलदारांना दिले आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, गेल्या 17 ते 18 दिवसापासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यासाठी संप सुरू आहे . त्यातील काही मागण्या मान्य झाल्या आहेत तर महत्त्वाची महामंडळाचे शासनात विलिनीकरणाची मागणी अद्याप मान्य झाली नाही , त्यासाठी राज्यातील सर्वच कर्मचारी संपावर आहेत. कर्मचारी संपावर असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बस बंद आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. जाणे-येणे अडचणीचे झाले आहे. अध्याप पावेतो संपाबाबत कुठलाच ठोस निर्णय झाला नाही. शासन व कर्मचारी यांच्या वादात जनता मात्र वेठीस धरली गेली आहे.

हेही वाचा: सोलापूर : लसीच्या प्रमाणपत्राशिवाय डिसेंबरचा मिळणार नाही पगार

शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध, यांची मोठी अडचण झाली आहे. या सर्वांचा विचार करून शिरापूर येथील शेतकरी अनिल पाटील यानी कर्मचाऱ्यांसह स्मशानभूमीत आंदोलन सुरू केले आहे . एस टी चे कर्मचारी हे शेतकऱ्यांची मुले आहेत, त्यामुळे लवकर मागणी मान्य न झाल्यास शेतकरी भाजीपालाही बंद करणार असून, गावाच्या स्मशानभूमीतच आपण आत्मदहन करणार असल्याचे जाहीर पाठिंब्याच्या पत्रकात उल्लेख केला आहे. पाटील यांचे स्मशानभूमीतील आंदोलन हा चर्चेचा विषय झाला आहे.

loading image
go to top