ZP टक्केवारी प्रकरण : पीए मोहिते म्हणाले, मला व्हिडिओ बघायचाय!

झेडपी टक्केवारी प्रकरण : पीए मोहिते म्हणाले, मला व्हिडिओ बघायचाय!
Solapur ZP
Solapur ZPSakal
Summary

पीए मोहिते यांनी जिल्हा परिषदेच्या सामान्य शाखेला पत्र देत, आपल्याला "तो' व्हिडिओ बघायचा असल्याचे सांगितले.

सोलापूर : जिल्हा परिषदेचे (Solapur ZP) अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे (Aniruddha Kamble) यांचे स्वीय सहाय्यक सूर्यकांत मोहिते (Suryakant Mohite) यांना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (CEO Dilip Swami) यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. ही नोटीस 21 ऑक्‍टोबरला मोहिते यांनी स्वीकारली. नोटीस स्वीकारल्यापासून सात दिवसात त्यांचा खुलासा अपेक्षित होता. खुलासा देण्याचा आज अंतिम दिवस होता. आजच्या अंतिम दिवशी पीए मोहिते यांनी जिल्हा परिषदेच्या सामान्य शाखेला पत्र देत, आपल्याला "तो' व्हिडिओ बघायचा असल्याचे सांगितले.

Solapur ZP
राष्ट्रवादीचे कल्याणराव काळे विरोधात 'ईडी', 'आयटी'कडे तक्रार!

जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अनिल मोटे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व त्यांचे स्वीय सहाय्यक सूर्यकांत मोहिते यांच्या टक्केवारीबद्दल गंभीर आरोप केला होता. त्यासंदर्भातील व्हिडिओही त्यांनी पत्रकार परिषदेत व्हायरल केला होता. या प्रकरणाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी 11 ऑक्‍टोबरला स्वीय सहाय्यक मोहिते यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. ही नोटीस मोहिते यांनी 21 ऑक्‍टोबरला स्वीकारली. नोटीस स्वीकारल्यापासून सात दिवसात खुलासा देण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केली होती.

नोटीसला खुलासा देण्याचा आज अंतिम दिवस होता. पीए मोहिते यांनी या संदर्भातील खुलासा दिला नाही. उलट आपल्याला तो व्हिडिओ बघायचा आहे. त्यासाठी तो व्हिडिओ मला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करणारे पत्रच त्यांनी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन शाखेला आज दिले आहे. पीए मोहिते यांची मूळ नियुक्ती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात असल्याने त्यांनी आज त्या पत्राची एक प्रत प्राथमिक शिक्षण विभागालाही पाठवली आहे.

Solapur ZP
MPSC : मागणीपत्रासाठी आता डिसेंबरची मुदत! सरसकट वयोमर्यादा वाढ नाहीच

प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

सोमवारी (ता. 25) झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी टक्केवारीचा हा विषय उचलून धरला होता. खुलासा आल्यानंतर स्वीय सहाय्यक मोहिते यांना तत्काळ निलंबित करतो, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सर्वसाधारण सभेत दिले होते. खुलासा सादर करण्याच्या अंतिम दिवशी मोहिते यांनी नवीन पत्र सामान्य प्रशासनाला दिल्याने त्यांचे हे पत्र जिल्हा परिषद प्रशासन मान्य करणार का?, पीए मोहिते यांना तो व्हिडीओ उपलब्ध करून देणार का? की पीए मोहिते यांच्यावर थेट कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com