esakal | सुशील किंवा सुशीलकुमार नाव असेल तर तुम्हाला मिळणार मोफत पेट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

सुशील किंवा सुशीलकुमार नाव असेल तर तुम्हाला मिळणार मोफत पेट्रोल

सुशील किंवा सुशीलकुमार नाव असेल तर तुम्हाला मिळणार मोफत पेट्रोल

sakal_logo
By
नामदेव कुंभार

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस (Sushil Kumar Shinde Birthday ) सोलापूरात भन्नाट पद्धतीने साजरा केला जात आहे. सोलापूर मधील काँग्रेसच्या एका नगरसेविकेनं राबवलेल्या हटके उपक्रमामुळं याचा अनुभव येत आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवासानिमित्त 501 रुपयांचं मोफत पेट्रोल देण्यात येत आहे. ज्यांचं नाव सुशील किंवा सुशीलकुमार असं आहे, अशा सर्व व्यक्तींना या उपक्रमाचा फायदा घेता येणार आहे. सोलापुरातील सात रस्ता येथील 'कारगीर' पेट्रोल पंपावर 501 रुपयांचं पेट्रोल मोफत देण्यात येत आहे. या पेट्रोलपंवर सुशीलकुमार नावांच्या व्यक्तींनी गर्दी केली असून मोफत पेट्रोलचा लाभ घेतला जात आहे.

सोलापूरमधील काँग्रेस नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवला आहे. यशदा युवती फाउंडेशनच्या वतीने सुशील किंवा सुशीलकुमार नाव असलेल्यांना 501 रुपयांच्या पेट्रोल दिलं जात आहे. कारीगर पेट्रोल पंपावर सकाळी साडेनऊ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत 501 रुपयांचं मोफत पेट्रोल दिलं जाणार असल्याची माहिती नगरसेविका फिरदोस पटेल यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचा निषेध आणि आपल्या नेत्याच्या नावाचा गौरव म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही फिरदोस पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा: रिक्षा-ट्रक-ट्रॅक्टरचा विचित्र अपघात, पाच जणांचा मृत्यु

मोफत पेट्रोलचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्यांना आधार कार्ड सोबत आणावे लागणार आहे. आधार सोबत असेल तरच रीतसर नोंद करून संबधित व्यक्तीला तत्काळ 501 रुपयांचे पेट्रोल भरून देण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलाय.

loading image
go to top