
काश्मीर फाईल्स चित्रपट बघणार सांगत सुशीलकुमार शिंदे म्हणाले...
सोलापूर : नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या द काश्मीर फाईल्सवरून (The Kashmir Files) देशातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले असून, या सिनेमावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी मोदींना टोला लगावला आहे. काश्मीर फाईल्सप्रमाणे पंतप्रधान मोदींनी गुजरात फाईल्सची प्रसिद्धी करावी असा टोला शिंदे यांनी मोदींना लगावला आहे. (Sushilkumar Shinde On Kashmir Files )
हेही वाचा: योगींच्या शपथविधीवर अखिलेश म्हणतात, आम्ही बांधलेल्या स्टेडीयमवर शपथ घेताना...
याशिवाय सिनेमांगृहांमध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा द काश्मीर फाईल्स आपण बघणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगत, सिनेमात विकृती दाखवणे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. आपण अद्यापपर्यंत तो सिनेमा बघितलेला नाही. त्यावर अनेक लोक बोलत आहेत. काश्मीर फाईल ज्याने काढला असेल त्याने काढला असेल, पण त्याआधी राणा आयुब यांनी लिहिलेले गुजरात फाईल (Gujrat File) अतिशय चांगल्या प्रकारे लिहले आहे. त्यामुळे ज्या प्रकारे काश्मीर फाईल्स ज्या प्रकारे प्रसिद्धी मोदीसह सर्वजण करत आहेत त्यांनी या सिनेमाचीदेखील प्रसिद्धी करावी, आणि दोन्हींचे बॅलेंन्सिंग करावे असे शिंदे म्हणाले.
Web Title: Sushilkumar Shinde On Kashmir File Movie
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..