
सोलापूर : शहरांतर्गत असलेले होटगी रोड विमानतळ किती दिवस चालणार? सुरू झाल्यापासून एकदाही पूर्ण क्षमतेने प्रवासी उपलब्ध झाले नाहीत. शहराचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असल्यास आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोरामणी विमानतळ होणे आवश्यक आहे. सत्ताधाऱ्यांनी माझ्या नावाचा बोर्ड काढून टाकत तो कचऱ्यात टाकावा, परंतु बोरामणी विमानतळ विकसित करा, अशी खंत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.