esakal | महाविकास आघाडीची भूमिका मान्य नसल्याने स्वाभिमानीचा विरोध
sakal

बोलून बातमी शोधा

Swabhimani Shetkari Sanghatana has opposed the role of Mahavikas Aghadi

माजी खासदार राजू शेट्टी  म्हणाले, राज्य साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची सुमारे 3 हजार कोटींची एफ आर पी रक्कम थकीत आहे.

महाविकास आघाडीची भूमिका मान्य नसल्याने स्वाभिमानीचा विरोध

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : राज्यातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाची भूमिका मान्य नसल्यानेच पंढरपूरच्या पोट निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीला विरोध केल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारासाठी राजू शेट्टी आज पंढरपुरात आले आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज सकाळी संत नामदेव पायरी जवळून विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवरचा आपला रोष व्यक्त केला.

आम्ही लस घेतली तुम्ही पण घ्या ! जिल्ह्यातील 63 हजार ज्येष्ठ नागरिकांसह दीड लाखजणांनी घेतली लस

यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी  म्हणाले, राज्य साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची सुमारे 3 हजार कोटींची एफ आर पी रक्कम थकीत आहे. ही रक्कम देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले नाहीत. लाॅकडाऊनमध्ये सरकारने भरमसाठ वीज बीलाची आकारणी करून लूट केली आहे. वीज माफ करावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वी सरकारकडे मागणी केली, परंतु सरकारने दुर्लक्ष केले आहे. जो पर्यत 100 युनिटपर्यंत घरगुती वीज बिल माफ केले जात नाही तो पर्यत सरकार विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशाराही शेट्टींनी दिला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसनं शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या या साखर कारखानदाराला उमेदवारी देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेला का विचारात घेतले नाही? असा प्रश्न ही शेट्टींनी उपस्थित केला. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मधील दोन उमेदवार साखर कारखानदार आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. यांच्याकडे निवडणूक लढवायला पैसे आहेत. पण शेतकऱ्यांचे थकीत पैसे देण्यासाठी नाहीत हे दुर्दैव आहे, अशी खंत राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

यावेळी रविकांत तुपकर, तानाजी बागल, सचिन पाटील, विजय रणदिवे, शहाजन शेख, विष्णू भाऊ बागल, रणजित बागल आदी उपस्थित होते.

loading image