
सोलापूर : सोलापूर महापालिकेला स्वच्छ भारत मिशन दोन अंतर्गत १८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातून शहरात हैदराबाद रोड आणि सिव्हिल येथील पीएचई सेंटर या दोन ठिकाणी कचरा संकलन केंद्र आणि भोगाव कचरा डेपो येथे एसएलएफ (सॅनिटरी लॅण्ड फिल प्रकल्प) उभारण्यात येणार आहे.