
कुर्डुवाडी : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या विद्यमाने श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे कुर्डुवाडी येथे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. शहरातून पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. हजारो भाविकांनी दर्शन घेतले. ‘श्री स्वामी समर्थ’ नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेले.