esakal | Solapur : जिल्हा दूध संघाचे प्रशासक पापळ यांची नियुक्ती रद्द !
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर जिल्हा दूध संघाचे प्रशासक पापळ यांची नियुक्ती रद्द

सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया सहकारी संघावर प्रशासक म्हणून शिवराम पापळ यांची नियुक्ती करण्यात आली होती.

सोलापूर जिल्हा दूध संघाचे प्रशासक पापळ यांची नियुक्ती रद्द

sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया सहकारी संघावर (Solapur District Milk Producers and Processing Co-operative Society) प्रशासक म्हणून शिवराम पापळ (Shivram Papal) यांची नियुक्ती करण्यात आली होती. उच्च न्यायालयात (High Court) आज (ता. 6) झालेल्या सुनावणीत ही नियुक्ती मागे घेत असल्याचे पत्र दुग्धविकास विभागाने आज सादर केले आहे. पापळ यांची नियुक्ती रद्द झाल्याने दूध संघावर आता पुन्हा एकदा श्रीनिवास पांढरे, आबासाहेब गावडे आणि सुनील शिंदे या तीन अधिकाऱ्यांचे प्रशासकीय मंडळ कार्यान्वित झाले आहे.

हेही वाचा: विमा कंपन्यांना दिले सव्वासहा हजार कोटी! पण शेतकऱ्यांना छदामही नाही

दूध संघावर प्रशासक नियुक्त करण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा किंवा मंजुरी देण्याचा अधिकार राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना आहे का?, मंत्र्यांनी प्रशासक नियुक्तीत हस्तक्षेप करण्याचा कायदेशीर अधिकार कायद्यात आहेत का? याबद्दल आजच्या सुनावणीत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश आज उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. जे. काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी दिले होते. त्यानुसार दुग्ध विकास विभागाने प्रशासक पापळ यांची नियुक्तीच मागे घेत असल्याचे पत्र आज न्यायालयात सादर केले आहे.

हेही वाचा: महावितरणचे 'स्मार्ट मीटर'! आता ग्राहकांना मिळणार प्रीपेड वीज

तीन अधिकाऱ्यांचे प्रशासकीय मंडळ दूध संघावर आले आहे. या मंडळाने धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत. दूध संघाचा दैनंदिन कारभार फक्त पाहावा. दूध संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक तातडीने घ्यावी यासाठीही न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

- अ‍ॅड. अभिजित कुलकर्णी

loading image
go to top