Gram Panchayat Election : 18 ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडी 9 जानेवारीपूर्वी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swapnil Rawde statement post of Upasarpanch of 18 Gram Panchayats before January 9 politics

Gram Panchayat Election : 18 ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडी 9 जानेवारीपूर्वी

मंगळवेढा : नुकत्याच झालेल्या तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक नऊ जानेवारी पूर्वी घेण्याबाबतचे आदेश तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिले आहेत. डिसेंबर मुदत संपलेल्या तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीमधील फटेवाडी व रहाटेवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या.

16 ग्रामपंचायत साठी 18 डिसेंबरला मतदान तर 20 डिसेंबरला मतमोजणी झाली.ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत निवडणूक विभागाचे उमाकांत मोरे, नायब तहसीलदार सुधाकर धाईजे, उपभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील पोलीस निरीक्षक रणजीत माने

यांनी शांततापूर्ण वातावरणात व नियोजनबद्ध राबवली एक दोन ठिकाणी किरकोळ वादाच्या घटना घडल्या परंतु त्या ठिकाणी त्यांनी तात्काळ लक्ष दिल्यामुळे तो वाद त्याचवेळी संपुष्टात आणला.निकालानंतर तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सर्वाधिक ग्रामपंचायती आपल्याच असल्याचा दावा केला.

परंतु निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती व केलेले जावे हे जास्त असल्यामुळे नागरिकांतून नेमक्या या ग्रामपंचायती कुणाच्या याबाबत उलट चर्चा सुरू झाल्या.सोड्डी, खोमनाळ बावची,पाटकळ, ग्रामपंचायतीने त्यांच्या नेत्याला आम्ही तुमचेच असलेले लेखी पत्र दिले.

गाव पातळीवर नेत्यांनी तालुक्यातील नेत्यांना देखील आम्ही तुमचीच असल्याचे सांगत बाय बाय करण्याचा प्रयत्न केला सरपंचाच्या थेट निवडणुकीमुळे आता उपसरपंचाच्या निवडी बाकी आहेत या निवडी नऊ जानेवारी पुर्वी घेण्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यासाठी 18 निवडणूक निरीक्षकाची नियुक्ती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी केले.

ग्रामपंचायत व निवडणूक निरीक्षकाचे नाव पुढीलप्रमाणे

रहाटेवाडी (सुधाकर धाईजे निवासी नायत तहसीलदार, खोमनाळ (एस साळुंखे महसूल तहसीलदार निवडणूक) पाटकळ (गवळी भूमी अभिलेख, फटेवाडी (बाळासाहेब बाबर, कृषी अधिकारी पंचायत समिती) हाजापुर (ए एच भगत कनिष्ठ अभियंता) गोणेवाडी (पी. वाय दुधाळ उप अभियंता )डोंगरगाव (चंद्रकांत जांगळे मंडल कृषी अधिकारी) भालेवाडी (राजेंद्र भांगे मंडल कृषी अधिकारी)

तळसंगी (विनायक तवटे कृषी अधिकारी पंचायत समिती)येड्राव (शिवकुमार पुजारी मंडळ कृषी अधिकारी) ढवळस (सुहास झिंगे नगररचना नगरपरिषद) मारापुर (एम ए कोलगे मंडळ कृषी अधिकारी), गुंजेगाव (गारूळे बालविकास अधिकारी), पौट (जे बी बिराजदार उपअभियंता),सोड्डी (हलकुडे उपविभागीय अधिकारी 52), बावची (एस.बी.पाटील उपविभागीय अधिकारी 38),शिरनांदगी जी.एस.बंडगर (कनिष्ठ अभियंता),मारोळी (व्ही ए बिराजदार कनिष्ठ अभियंता),