कर न भरलेल्या वाहनांचा लिलाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RTO-Police

Solapur; कर न भरलेल्या वाहनांचा लिलाव

सोलापूर : मोटार वाहन अधिनियमांतर्गत मोटार वाहन कर न भरलेली वाहने सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने जप्त केली आहेत. या जप्त करण्यात आलेल्या २५ वाहनांचा ई-लिलाव २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने देण्यात आली.

जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये बस, ट्रक, डी व्हॅन, पिकअप व्हॅन, टूरिस्ट टॅक्सी, जेसीबी यांचा समावेश आहे. वाहनांच्या मालकांना थकीत कर भरणा कळविण्यात आल्यानंतर देखील वाहन मालकांनी कर भरलेला नाही. अशा वाहनांचा ई-लिलाव करण्यात येत आहे. वाहन मालकांना लिलावाच्या तारखेपर्यंत कर भरण्याची संधी राहील. लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कार्यालयाच्या सूचना फलकावर जनतेच्या माहितीसाठी प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सविस्तर माहितीसाठी संबंधित व्यक्तींनी कार्यालयाशी संपर्क साधावा. लिलावाच्या अटी लिलावाच्या अगोदर ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात येणार असून, इच्छुकांनी भाग घ्यावा, असे आवाहन सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.

लिलावात सहभागी होण्यासाठी...

जाहीर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी १२ ते १९ सप्टेंबर या कालावधीमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथे खटला विभागात सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रत्येक वाहनासाठी ५० हजार रुपये रकमेचा डीवाय आरटीओ, सोलापूर नावाने अनामत रकमेच्या डिमांड ड्राफ्टसह ऑनलाइन दिलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी करणे व कागदपत्रे पडताळणी, अप्रुव्हल करून घेणे गरजेचे आहे.

Web Title: Tax Free Vehicles Rto Appeals

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..