Solapur New : मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिक्षक समितीचे 16 फेब्रुवारीला वेंगुर्ल्यात अधिवेशन

सिंधूदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या पर्यटन स्थळी हे विराट महाअधिवेशन संपन्न होणार असून दि. 15 फेब्रुवारी रोजी राज्यातील नामवंत शिक्षण तज्ञांच्या उपस्थितीत शिक्षण परिषद संपन्न होणार
Teacher committee session February 16 in Vengurlya Chief Minister Eknath Shinde anil kade
Teacher committee session February 16 in Vengurlya Chief Minister Eknath Shinde anil kadesakal
Updated on

मंगळवेढा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे 17 वे त्रैवार्षिक महाअधिवेशन दि. 15 व 16 फेब्रुवारी रोजी वेंगुर्ला ( सिंधूदुर्ग ) येथे संपन्न होणार असून खुल्या अधिवेशनाचे उदघाटक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती शिक्षक समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांनी दिली.

शिक्षक समितीच्या मागील 16 राज्य अधिवेशनातून संघटनेची ताकद अधोरेखीत झाली असून याच बळावर अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक झाली आहे . सिंधूदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या पर्यटन स्थळी हे विराट महाअधिवेशन संपन्न होणार असून दि. 15 फेब्रुवारी रोजी राज्यातील नामवंत शिक्षण तज्ञांच्या उपस्थितीत शिक्षण परिषद संपन्न होणार असून शिक्षणाची सद्यस्थिती , विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भवितव्याचे प्रश्न , शिक्षकांचे प्रश्न याविषयी सखोल चिंतन होणार असून विविध ठराव पारीत होणार आहेत.

दि. 16 फेब्रुवारी रोजी खुले अधिवेशन होणार असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री नारायण राणे , ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन , ना. उदय सामंत , ना.दादा भुसे , ना. रविंद्र चव्हाण यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मूळची जुनी पेन्शन योजना लागू व्हावी , शिक्षण क्षेत्रातील विविध संवर्गीय रिक्त पदे भरण्यात यावीत , अशैक्षणिक कामे व अनावश्यक आॕनलाईन कामांतून शिक्षकांना मुक्तता व्हावी , मुख्यालयी राहण्याची अट शिथील करावी ,

वेतनश्रेणीतील त्रुटी दूर कराव्यात , ग्रामीण भागातील शाळांच्या वीज , पाणीसह अन्य भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात , आश्वासित प्रगती योजना लागू व्हावी यासह अनेक मागण्या अधिशेनाच्या व्यासपीठावरुन मांडल्या जाणार आहेत . या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे असून अध्यक्षस्थान राज्याध्यक्ष उदय शिंदे हे भूषविणार आहेत .

राज्याच्या शिक्षण क्षेत्रांत निर्माण झालेल्या प्रश्नांची तीव्रता राज्यकर्त्यांपुढे ताकदीने मांडून सोडवणूक करवून घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधवांनी मोठ्या संख्येने हजर रहावे असे आवाहन जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने सरचिटणीस अमोघसिद्ध कोळी यांनी केले.

1962 पासून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात शिक्षक समितीचे जाळे विणले गेले असून वाडीवस्तीपर्यंत ही चळवळ पोहचली आहे. मागील साठ वर्षात शिक्षक समितीने प्राथमिक शिक्षकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे यादृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय राज्यकर्त्यांकडून करवून घेण्यात यश मिळवले.

1977 साली 54 दिवसाच्या संपात शेवटपर्यंत भागीदारी केल्याने संघर्ष करणारी एकमेव शिक्षक संघटना म्हणून शिक्षक समितीने लौकिक मिळविला आहे . या यशस्वी लढ्यामुळेच आजही केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई व वेतनभत्ते मिळत आहेत.

- सुरेश पवार,माजी राज्य संपर्क प्रमुख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.