

Kurduwadi Road Accident Claims Teachers Life After Independence Day Flag Hoisting Ceremony At School
sakal
कुर्डुवाडी: स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ध्वजवंदनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या शिक्षकाच्या दुचाकीला टेंपोने जोरात धडक दिल्याने शिक्षक संजय बाळकृष्ण कांबळे (रा. भोसरे, ता. माढा) यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना ता. १५ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास कुर्डुवाडी-करमाळा रस्त्यावरील ढवळस पाटी येथे घडली.