

Delay in Teacher Transfers Raises Concern, Headmasters’ Salaries at Risk
sakal
सोलापूर: स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांची १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार संचमान्यता केली जात आहे. डिसेंबरमध्ये संचमान्यता पूर्ण होणे अपेक्षित होती, पण अजूनही माध्यमिक विभागाकडील दोन हजारांहून अधिक शाळांची संचमान्यता अंतिम झालेली नाही. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे. त्यामुळे समायोजनानंतर शिक्षकांच्या बदल्या आणि नवीन शिक्षक भरतीसाठी जुलै उजाडणार आहे.