
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील सेवेत कार्यरत १ हजार १२९ आणि सेवानिवृत्त शिक्षकांची वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम मागील तीन वर्षांपासून प्रलंबित होती. त्यासाठी ९ कोटी ३२ लाख ३३ हजार ६२४ रुपये जिल्हा परिषदेला मिळाले आहेत. प्राथमिक शिक्षण विभागाने ती रक्कम जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग केली आहे.