
मोहोळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमांतर्गत मोहोळ तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या वतीने तालुक्यातील सर्वांना ई-शिधापत्रिका घरपोच उपलब्ध करून देण्याचा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्णय तहसीलदार सचीन मुळीक यांनी घेतला असुन सोलापुर जिल्ह्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे.