

सांगोला : हैदराबाद येथून टाटा मूलभूत संशोधन केंद्राने खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सोडलेला ८०० किलो वजनाचा टेलिस्कोप (दुर्बीण) पॅराशूटसह रविवारी सकाळी सहाच्या सुमारास अचानक सांगोला शहरातील मानवी वस्ती पडल्याने एकच खळबळ उडाली. अचानक वाऱ्याची दिशा बदलामुळे हे उपकरण मानवी वस्तीत कोसळले असले तरी यामुळे जीवितहानी मात्र झाली नाही. एका कारचे मोठे नुकसान झाले.