Solapur Accident News: टेंभुर्णी- अकलूज रोडवर दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक, तीन जण ठार; वाढदिवशीच युवकाला मृत्युने कवटाळले

Solapur Accident News : मयतांमध्ये दोघेजण करकंब येथील तर एक जण अकलूज येथील रहिवाशी आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर या अपघातात दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत.
Solapur Accident News
Tembhurni Akluj road accident, fatal bike collision, youth dies on birthdayesakal
Updated on

सोलापूर - जिल्ह्यातील टेंभुर्णी-अकलूज रस्त्यावर दोन मोटारसायकल्सच्या भीषण अपघातात तीन युवक ठार झाले आहेत. तर या अपघातात दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. मयतांमध्ये दोघेजण करकंब येथील तर एक जण अकलूज येथील रहिवाशी आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास झाला असून टेंभुर्णी पोलीसठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com