esakal | टेंभुर्णीत जागतिक महिला दिनानिमित आशा वर्कर्सचा सन्मान

बोलून बातमी शोधा

Tembhurni has honored Asha Workers on the occasion of International Womens Day

टेंभुर्णीत जागतिक महिला दिनानिमित आशा वर्कर्सचा सन्मान करण्यात आले

टेंभुर्णीत जागतिक महिला दिनानिमित आशा वर्कर्सचा सन्मान
sakal_logo
By
संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : टेंभुर्णी येथील एकता महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लाॅकडाऊनच्या काळात जीव थोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या आशा वर्कर्स व कॅन्सर फाऊंडेशनच्या माध्यमातून टेंभुर्णी परिसरात जनजागृतीचे कार्य करणाऱ्या रेणूका भणगे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शुभदा महिला बचत गटाच्या अध्यक्षा स्वाती पाटील भीमानगरकर या उपस्थित होत्या. 

यावेळी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. एकता महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, आशा वर्कर्सनी स्वतः चा व त्यांच्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून कोरोना काळात घरोघरी जाऊन तपासणी केली. अत्यल्प मानधन असताना देखील अत्यंत उत्तम सेवा देण्याचे काम आशा वर्कर्स करीत आहेत.

आशा वर्कर्सच्या परिवेक्षिका आशा पुरंदरे म्हणाल्या की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असल्याने प्रत्येकाने मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन त्यांनी केले. 

स्वाती पाटील म्हणाल्या की, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक महिलांनी कार्य करावे. यावेळी एकता महिला मंडळाच्या उपाध्यक्षा छाया जाधव, उल्फत मुलाणी, अंजली अरगडे, हवाबी मुलाणी, स्मिता पालांडे आदी उपस्थित होत्या. यावेळी रेणूका भणगे, आशा वर्कर्स परिवेक्षिका आशा पुरंदरे, सचिव वनिता सरवदे, आरती दाखले, ज्योस्ना खरात, स्वाती देशमुख, शीतल सरवदे, योगेश्री कोकाटे, सारिका जगताप, आशा सुतार, सोनाली ननवरे, राजश्री सुक्रे, आरती गायकवाड, पल्लवी खंकाळ, सुनिता मोरे, ललिता होदाडे, सारिका बंगाळे, सीमा लोखंडे यांना सन्मानित करण्यात आले. उपस्थितांचे आभार अंजली अरगडे यांनी मानले.