

NEET JEE Coaching Fee Fraud
ESakal
टेंभुर्णी : टेंभुर्णी येथील प्रोट्राक कायझन ॲकॅडमी चे संचालक विजय राॅबर्ट व त्यांची पत्नी विजी थाॅमस यांनी इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नीट व जेईई साठी फाऊंडेशन कोर्स करिता टेंभुर्णी शहर व परिसरातील पालकांकडून हजारो रूपये फी च्या स्वरूपात भरून घेऊन फक्त दिड महिना क्लास घेतले. नंतर अचानक ॲकॅडमी बंद करून विद्यार्थ्यांनी फी साठी भरलेले पैसे बुडवून ते पसार झाले. ही घटना 15 मार्च 2026 ते 3 जून 2026 दरम्यान घडली. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात प्रोट्राक कायझन ॲकॅडमी चे संचालक विजय राॅबर्ट व त्यांची पत्नी विजी थाॅमस यांनी 3 लाख 11 हजार रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.