वाळू माफियांची शिरजोरी ! "या' गावच्या तलाठ्यांना धमकी देत पळवला टेम्पो

Sand
Sand
Updated on

सांगोला (सोलापूर) : चोरीची वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडून कारवाईसाठी घेऊन जात असताना वाळू माफियांनी मोटरसायकलवरून पाठलाग करत टेम्पो अडवला. "आम्ही टेम्पो घेऊन जाऊ देणार नाही, तुम्ही आडवे आलात तर याद राखा, मग तुम्हाला बघून घ्यावे लागेल', अशी तलाठ्यांना धमकी देत वाळू माफियांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करत टेम्पो पळवून नेला. ही घटना शनिवारी (ता. 22) रात्री पावणेएकच्या सुमारास सांगोला महाविद्यालयासमोर घडली. 

जवळा (ता. सांगोला) येथील कोरडा नदीपात्रात काहीजण विनापरवाना वाळू उपसा करत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदारांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी घेरडीचे तलाठी कुमाररवी राजवाडे, बलवडीचे तलाठी दिनेश सोनवणे, जवळ्याचे तलाठी संभाजी जाधव असे तिघेजण शुक्रवारी (ता. 21) रात्री साडेअकराच्या सुमारास जवळा येथे गेले होते. त्या वेळी त्यांना नदीपात्रात काहीजण विनापरवाना टेम्पोमध्ये वाळू भरत असल्याचे दिसून आले. तलाठ्यांची चाहूल लागताच वाळूचोर टेम्पो घेऊन पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून टेम्पो पकडला. 

महसूलचे कर्मचारी टेम्पो व पाऊण ब्रास वाळू असा तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पुढील कारवाईसाठी टेम्पो सांगोल्याला घेऊन येत होते. रात्री पावणे अकराच्या सुमारास सांगोला महाविद्यालयासमोर पांडुरंग अण्णासाहेब साळुंखे, प्रदीप सुनील साळुंखे, श्रीशैल ऊर्फ केदार विलास कोरे, पद्माकर पोपट साळुंखे (सर्व रा. जवळा, ता. सांगोला) यांनी त्यांचा पाठलाग करत सांगोला महाविद्यालयासमोर मोटरसायकल आडवी लावत टेम्पो अडवला. त्या वेळी त्यांनी तलाठ्यांना दमदाटी, शिवीगाळ करत "आम्ही टेम्पो घेऊन जाऊ देणार नाही, आमचा टेम्पो आम्ही परत घेऊन जाणार आहोत, तुम्ही आडवे आलात तर याद राखा, मग तुम्हाला बघून घ्यावे लागेल' अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या वेळी तलाठ्यांनी "सरकारी कामात हस्तक्षेप करू नका, टेम्पोत चोरीची वाळू आहे. त्यामुळे कारवाई करीत आहोत', असे सांगत असताना पांडुरंग साळुंखे याने वाळूसह टेम्पो पळवून नेला. तसेच प्रदीप साळुंखे, श्रीशैल ऊर्फ केदार कोरे, पद्माकर साळुंखे हे तिघेही मोटरसायकलवरून पसार झाले. 

याबाबत तलाठी कुमाररवी राजवाडे यांनी पांडुरंग साळुंखे, प्रदीप साळुंखे, श्रीशैल ऊर्फ केदार कोरे, पद्माकर साळुंखे (सर्वजण रा. जवळा) यांच्याविरुद्ध वाळू चोरी व सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी फिर्याद दिली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur Zilla Parishad Audit Flags 2 Point 13 Crore Rent Paid To 37 Ashram Schools Over Additional Space Claims
solapur district court
boramani murder case
solapur city police
Marathi News Esakal
www.esakal.com