esakal | Solapur : खरीप पीक कर्जवाटपात दहा बॅंका पन्नास टक्‍क्‍यांच्या आत! जिल्हा प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

खरीप पीक कर्जवाटपात दहा बॅंका पन्नास टक्‍क्‍यांच्या आत!

ज्या बॅंका शेतकऱ्यांना मुबलक कर्जपुरवठा करू शकत नाहीत, त्यांच्यावर जिल्हा प्रशासन काय कार्यवाही करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खरीप पीक कर्जवाटपात दहा बॅंका पन्नास टक्‍क्‍यांच्या आत!

sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोना (Covid-19) महामारीच्या संकटासोबत झुंजणाऱ्या बळिराजाला यंदाच्या खरिपात मुबलक पीककर्ज (Crop loan) पुरवठा करण्याच्या सूचना राज्य शासनापासून जिल्हा प्रशासनापर्यंत सर्वांनी दिल्या होत्या. सोलापूर जिल्ह्यातील दहा बॅंकांनी (Banks) शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामामध्ये कर्ज वाटपात उद्दिष्टाच्या पन्नास टक्केही कर्जपुरवठा केला नाही. जिल्ह्याने एकूण उद्दिष्टाच्या 103.33 टक्के उद्दिष्ट 30 सप्टेंबर अखेर पूर्ण केले आहे. ज्या बॅंका शेतकऱ्यांना मुबलक कर्जपुरवठा करू शकत नाहीत, त्यांच्यावर जिल्हा प्रशासन काय कार्यवाही करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: उड्डाणपुलांसाठी महापालिका काढणार कर्ज! योजना रद्दच्या मार्गावर

यंदाच्या खरिपात जिल्ह्यातील 1 लाख 15 हजार 715 शेतकऱ्यांना 1 हजार 473 कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप झाले आहे. शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात युनियन बॅंक ऑफ इंडिया, आयडीबीआय बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, कॅनरा बॅंक, इंडियन ओव्हरसीज बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक, इंडियन बॅंक, युको बॅंक, कर्नाटक बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक या दहा बॅंकांनी उद्दिष्टाच्या रकमेच्या पन्नास टक्‍के पीक कर्जपुरवठा केला आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील 1 लाख 25 हजार 163 शेतकऱ्यांना 1 हजार 426 कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 15 हजार 715 शेतकऱ्यांना 1 हजार 473 कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक पीक कर्जवाटप सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने केले आहे. या बॅंकेने 39 हजार 923 शेतकऱ्यांना 310 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. या बॅंकेने दिलेल्या उद्दिष्टाच्या 200.3 टक्के कर्ज वाटप केले आहे. त्या खालोखाल बॅंक ऑफ इंडियाने 133 टक्के कर्ज वाटप केले आहे. युनियन बॅंक ऑफ इंडियाने 40.46 टक्के, आयडीबीआय बॅंकेने 44.96 टक्के, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया 23.87 टक्के, कॅनरा बॅंकेने 26.76 टक्के, इंडियन ओव्हरसीज बॅंकेने 34.67 टक्के, पंजाब नॅशनल बॅंकेने 2.42 टक्के, इंडियन बॅंकेने 38.32 टक्के, युको बॅंकेने 31.32 टक्के एवढेच कर्जवाटप केले आहे.

हेही वाचा: महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत 'सकाळ' प्रथम!

कर्नाटक, कोटकचे कर्ज वाटपच नाही

सोलापुरात असलेल्या कर्नाटक व कोटक महिंद्रा या दोन्ही बॅंकांना यंदाच्या खरिपासाठी प्रत्येकी 139 शेतकऱ्यांना एक कोटी 56 लाख रुपये खरीप पीक कर्ज देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या दोन्ही बॅंकांची प्रत्येकी एक- एकच शाखा सोलापुरात आहे. यंदाच्या खरीप हंगामामध्ये या दोन्ही बॅंकांनी जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला पीक कर्ज पुरवठा केलेला नाही, हे विशेष.

loading image
go to top