Solapur News : तब्बल ३५ लाखांची निविदा; ‘शासन आपल्या दारी’वर जिल्हा प्रशासनाची उधळपट्टी

सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. सरासरीच्या ४० ते ४५ टक्के पाऊस यंदा कमी झाला आहे.
tender of 35 lakhs extravagance of district administration on shasan aplya dari solapur
tender of 35 lakhs extravagance of district administration on shasan aplya dari solapursakal

सोलापूर : शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोचवाव्यात यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविला जात आहे. सर्वसामान्यांची सरकारी कार्यालयात अडकलेली कामे व्हावी, असा उद्देश यामागे आहे. जिल्ह्यातील पुढे ढकललेला कार्यक्रम लवकरच होणार आहे.

शासनाने केलेल्या कामाचे प्रदर्शन मांडण्यासाठी, फक्त एलईडी स्क्रीन व स्पीकरसाठी जिल्हा प्रशासन ३५ लाख रुपये खर्च करणार आहे. यासंदर्भात टेंडर बांधकाम भागाकडून काढण्यात आले आहे.

या कार्यक्रमातून लोकांच्या झालेल्या कामाची जी आकडेवारी दाखवली जात आहे, त्यातून शासकीय कार्यालयात किती प्रकरणे प्रलंबित आहेत, याची प्रचिती येत आहे. या उपक्रमातून किती जणांना फायदा झाला, हा भाग निराळा असला तरी या उपक्रमावर सरकार करत असलेला खर्च मात्र प्रचंड असल्याचे दिसून येत आहे.

‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी ऑनलाइन टेंडर जारी केले आहे. २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत हे टेंडर भरण्याची मुदत आहे. ६ नोव्हेंबर रोजी ही निविदा उघडण्यात येणार आहे. या निविदेसाठी फक्त बांधकाम विभागातील ठेकेदारालाच मान्य करण्यात आले आहे. हे यातील विशेष बाब दिसून येते.

शेतकरी चिंतेत, प्रशासनाकडून उधळपट्टी

सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. सरासरीच्या ४० ते ४५ टक्के पाऊस यंदा कमी झाला आहे. जिल्ह्यात पाच तालुक्यांमध्ये टंचाईची परिस्थिती सरकारने जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना मदत करताना शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगितले जात आहे.

तरी अशा कार्यक्रमावर स्क्रीन व स्पीकरसाठी ३५ लाखांची उधळपट्टी करण्यात येत असल्याचे पाहून शेतकऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशा कार्यक्रमावर उधळपट्टी करण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com