
सोलापूर : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होऊन अडीच महिने उलटले आहेत. दरम्यान, त्याची उत्तरसूचीही जाहीर झाली आहे. टीईटीच्या निकालानंतर उमेदवारांना टीएआयटी ही पात्रता परीक्षा द्यावी लागणार असल्याने त्यापूर्वी टीईटीचा निकाल लागणे आवश्यक आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार निकाल जाहीर व्हावा, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.