
सोलापूर : सोलापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री नीतेश राणे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कागदावर काढलेले कोंबड्याचे चित्र दाखवत निषेध व्यक्त केला. मंत्री नीतेश राणे यांचा ताफा हत्तुरे वस्ती येथील विमानतळाबाहेर येताच उपशहरप्रमुख संतोष घोडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोंबड्याचे चित्र दाखवत कोंबडी चोर, कणकवलीचा चिकन आला, अशा घोषणा देत त्यांचा निषेध केला.