माय-लेकीच्या खून प्रकरणात संशयित आरोपी पतीला अटक! Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माय-लेकीच्या खून प्रकरणात संशयित आरोपी पतीला अटक!
माय-लेकीच्या खून प्रकरणात संशयित आरोपी पतीला अटक!

माय-लेकीच्या खून प्रकरणात संशयित आरोपी पतीला अटक!

करमाळा (सोलापूर) : भिलारवाडी (ता. करमाळा) (Karmala) येथील मायलेकीच्या खून (Crime) प्रकरणात संशयित आरोपी अण्णासाहेब भास्कर माने (वय 41, रा. भिलारवाडी) याला पंढरपुरात (Pandharpur) गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस पथकाने अटक केली. 8 नोव्हेंबर रोजी भिलारवाडी येथे पत्नी लक्ष्मी माने (वय 35) व मुलगी श्रुती (वय 13) यांचा खून करून तो फरार झाला होता. पंढरीत कार्तिकी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती. असे असतानाही गोपनीय माहितीच्या स्रोतांमुळे संशयित मानेची माहिती मिळाली. त्यानुसार गर्दीतही त्याला ओळखून पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.

मुलीसह पत्नीचा खून करून फरार झालेल्या बापाविरुद्ध करमाळा पोलिसात सोमवारी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. खून करून संशयित आरोपी अण्णासाहेब माने हा फरार झाला होता. पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर आठ दिवसांनी त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत मृत लक्ष्मी माने यांचा देवळाली येथील भाऊ कमलेश गोपाळ चोपडे (वय 30, रा. देवळाली, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा: दुचाकीवरून मुलासोबत मुलगी पसार! महिलेवर रिक्षाचालकाचा अत्याचार

अण्णासाहेब मानेला पकडण्यासाठी करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली होती. तपासासाठी संशयिताचे छायाचित्र, त्याच्या दुचाकीचा नंबर पोलिसांच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपमध्ये व ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून देण्यात आला होता. त्यानुसार पंढरपूर शहर पोलिस गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी आपल्या पथकाला सतर्क केले होते. मंगळवारी माने हा श्री विठ्ठल मंदिराशेजारील संत तुकाराम भवनसमोर उभा असल्याची माहिती मगदुम यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पोलिस हवालदार मुलाणी, पोलिस नाईक सुनील जाधव, विनोद पाटील, महिला पोलिस पवार व घुमरे यांच्यासह मंदिराजवळ पोचले. तेव्हा संशयित मानेला वेढा टाकून ताब्यात घेण्यात आले.

loading image
go to top