ना मास्क ना प्रतिबंधित लस! 'सिग्नल'वरील निराधार ठरतील कोरोना वाहक | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ना मास्क ना प्रतिबंधित लस! 'सिग्नल'वरील निराधार ठरतील कोरोना वाहक
ना मास्क ना प्रतिबंधित लस! 'सिग्नल'वरील निराधार ठरतील कोरोना वाहक

ना मास्क ना प्रतिबंधित लस! 'सिग्नल'वरील निराधार ठरतील कोरोना वाहक

सोलापूर : शहरातील सिग्नलवर (Traffic Signal) निराधार याचकांकडून वाहनचालकांना पैसे मागणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. आसरा व सिव्हिल चौकातही अशा लोकांचे विशेषत: महिला, लहान मुलांचे प्रमाण लक्षणीय आहे. सिग्नलवरील चौकात वाहतूक पोलिस (Traffic Police) असतानाही, अनेक वरिष्ठ अधिकारी त्या मार्गावरून ये-जा करतात, तरीही त्याकडे काणाडोळा होतोय, हे विशेष. (The beggars on the city's signal is feared to be the carrier of the Corona)

हेही वाचा: महाराष्ट्रात मेगाभरती! 25 विभागांमध्ये भरणार 15 हजार 511 पदे

पुणे (Pune), मुंबई (Mumbai) यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये (Metro City) सिग्नलवर भीक मागणारे पाहायला मिळायचे. परंतु, आता तसा प्रकार सोलापुरातील (Solapur) महावीर चौक, आसरा चौक, डफरीन चौक, सिव्हिल चौक या ठिकाणीही पाहायला मिळतोय. ते राहतात कुठे, कुठून आले आहेत, त्यांची चिमुकली शिक्षण घेतात का, यादृष्टीने कोणीही पाहात नाही. कोरोनाच्या (Covid-19) दोन्ही लाटांनंतर राज्य आता तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. सिग्नलवर पैसे मागणाऱ्या त्या निराधारांकडे मास्कही नाहीत. त्यांनी प्रतिबंधित लस (Covid Vaccine) टोचली का, याकडेही कोणाचेच लक्ष नाही. सिग्नलवरील वाहनांच्या गर्दीतून विनामास्क बिनधास्त फिरणारे ते भीक मागणारे निराधार कोरोनाचे वाहक ठरतील, अशी भीती वर्तविली जात आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, एका सिग्नलवर दिसणारे लोक काही दिवसांनी त्या ठिकाणी दिसतच नाहीत. शहरातील ठिकठिकाणी अनोळखी व्यक्‍तींच्या मृत्यूची नोंद मागील दीड वर्षापासून सातत्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Civil Hospital) होते. ते लोक कोण, यातील बहुतेक लोकांचा शोध लागलाच नाही. दुसरीकडे, शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानंतर बालमजूर (Child Labour), बालकामगार तथा शिक्षण न घेणाऱ्या बालकांच्या शोधासाठी अख्खा शालेय शिक्षण विभाग (School Education Department) कामाला लागतो. वेळप्रसंगी पोलिसांचीही मदत घेतात. मात्र, आसरा चौकासह शहरात ठिकठिकाणी आठ-दहा वर्षांची चिमुकली पैसे मागत फिरत असतानाही त्याकडे ना पोलिस (Police) ना महापालिका प्रशासनाचे लक्ष आहे. त्या चिमुकल्यांना शिक्षणाचा अधिकार, हक्‍क मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणा पुढे येताना दिसत नाहीत.

हेही वाचा: Solapur : गेल्या वर्षात 665 जण बेपत्ता! 154 महिला सापडल्याच नाहीत

'खायला काही नको, पैसे द्या मला'...

महिलेच्या कुशीतील काही महिन्यांचा चिमुकला घेऊन येणाऱ्या महिलेने एका व्यक्‍तीकडे पैसे मागितले. त्याने त्या मातेच्या कुशीतील चिमुकला पाहून दोन-पाच रुपये देण्याऐवजी काहीतरी खायला देऊ केले. 15 ते 20 रुपयांचा चहा-बिस्कीट देतो म्हणून त्याने त्या महिलेला सांगितले. त्यावेळी त्या महिलेने उत्तर दिले, 'खायला काही नको, पैसे द्या मला'. यावरून त्या व्यक्‍तीला असे वाटले की, त्यांना कोणीतरी जबरदस्तीने पैसे मागायला पाठवत आहे. त्याचा शोध पोलिसांनी घेणे अपेक्षित आहे. मात्र, कोणाचेही काहीच लक्ष नसल्याची स्थिती पाहायला मिळत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top