Solapur : गेल्या वर्षात 665 जण बेपत्ता! 154 महिला सापडल्याच नाहीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur : गेल्या वर्षात 665 जण बेपत्ता! 154 महिला सापडल्याच नाहीत
गेल्या वर्षात सोलापुरातून 665 जण बेपत्ता! 154 महिला सापडल्याच नाहीत

Solapur : गेल्या वर्षात 665 जण बेपत्ता! 154 महिला सापडल्याच नाहीत

सोलापूर : गेल्या वर्षात (2021) सोलापूर शहरातून (Solapur City) 18 वर्षांखालील 24 मुले आणि 209 पुरुष तर 23 अल्पवयीन मुली आणि 18 वर्षांवरील तब्बल 409 महिला असे एकूण 665 जण बेपत्ता (Missing) झाले आहेत. न सापडलेल्यांना शोधण्यासाठी पोलिसांच्या (Solapur Police) बरोबरीनेच पालकांचेही प्रयत्न सुरू आहेत. तरीही, त्यापैकी 265 लोक अजूनपर्यंत सापडलेले नाहीत. ते गेले कुठे, असा प्रश्‍न पालकांच्या मनात असून पोलिसांच्या माध्यमातून ते त्या प्रश्‍नाचे उत्तर शोधू लागले आहेत. (In 2021, 432 women and girls went missing in Solapur)

हेही वाचा: नववर्षानिमित्त श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरास फळा-फुलांची आकर्षक आरास

कोरोनाच्या (Covid-19) संकटामुळे सर्वसामान्य कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाल्याची वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे, शाळा (School) बंद राहिल्याने ऑनलाइन शिक्षणासाठी महागडा मोबाईल घेऊन देणेही काहींना शक्‍य झाले नाही. पालक आणि मुलांमधील संवाद हरवू लागला आहे. कोरोना काळात अनेकांचा जॉब गेला, हाताला काम राहिले नाही. त्यामुळे कौटुंबिक वादाचे प्रसंगही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले. एका वर्षात जवळपास 700 तक्रारींची नोंद महिला सुरक्षा कक्षाकडे झाली. त्यातील काहींवर सकारात्मक मार्ग निघाला तर काहींचे प्रकरण पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून न्यायालयात गेले. दुसरीकडे महिला, मुली, अल्पवयीन मुले, मोठे तरुण, पुरुषही बेपत्ता झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. त्यातील अनेकांनी 'प्रेमासाठी वाट्टेल ते' म्हणत पलायन केल्याचे बाब पोलिस तपासात समोर आले आहे. प्रेम प्रकरणातून अनेकजण बेपत्ता झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. ज्यांचा शोध लागला नाही, त्यांचा सायबर पोलिस, स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून शोध सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यंदा बेपत्ता झालेल्यांबद्दल थोडंसं...

  • बेपत्ता मुले, पुरुष : 233

  • शोध न लागलेले : 323

  • बेपत्ता मुली, महिला : 432

  • शोध न लागलेले : 154

बेपत्ता झालेल्या बहुतेक मुले, मुली, महिला, पुरुषांचा शोध लागला असून न सापडलेल्यांचाही शोध सुरू आहे. 'ऑपरेशन मुस्कान'च्या माध्यमातूनही सातत्याने अल्पवयीन मुलांचा शोध घेतला जातो.

- हरीश बैजल, पोलिस आयुक्‍त, सोलापूर

हेही वाचा: Health Workers साठी गूड न्यूज! नववर्षात 'या' कर्मचाऱ्यांना प्रमोशन

पालक झिजवतात पोलिस ठाण्यांचे उंबरठे

अल्पवयीन मुलगी, मुलगा, विवाहाला आलेली मुलगी, विवाह झालेली सून, मुलगी, मुलगा काही कारण सांगून अथवा काहीही न सांगताच घरातून निघून गेले. त्यांच्या चिंतेतून पालकांनी पोलिस ठाणे गाठले. काहींना शोधण्यात पोलिसांना यश आले, काहीजण पुन्हा परत आले, मात्र काहीजण अजूनपर्यंत सापडलेच नाहीत. त्यांचा शोध लागला का नाही, याची विचारणा करण्यासाठी बेपत्ता झालेल्यांचे पालक पोलिस ठाण्यांचे उंबरठे झिजवत असल्याची स्थिती आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top