कोरोना महामारीत बोगस लॅबचालकांचा सुळसुळाट ! रुग्णांच्या जीवाशी मांडला खेळ

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना बोगस लॅबचालकांचा व्यवसाय जोरात सुरू आहे
Lab
LabCanva
Updated on

ब्रह्मपुरी (सोलापूर) : राज्यभरात लॅबोरेटरी सेवा देणारे पॅथॉलॉजिस्ट (Pathologist) तुलनात्मक दृष्टीने अत्यल्प आहेत. या अनुषंगाने आरोग्यसेवा अबाधित ठेवण्यासाठी शासनाने डीएमएलटी पदवीधारकांना क्‍लिनिकल लॅबोरेटरी सेवा ठेवण्यासाठी लॅबोरेटरी सेवा मेडिकल कौन्सिल कायदा 2011, 19 जुलै 2012 व 2016 चा अधिनियम क्रमांक 6 तसेच 30 जानेवारी 2016 अन्वये 18 ऑक्‍टोबर 2017 पासून स्वतंत्रपणे पॅरा वैद्यकीय परिषद अस्तित्वात आणले आहे. या अधिनियमाखाली कलम 26 (1) अंतर्गत स्पष्ट तरतूद केली आहे. पॅरामेडिकल कौन्सिल नोंदणीचे प्रमाणपत्र ज्याच्याकडे नसेल अशा स्वतंत्रपणे क्‍लिनिकल लॅब चालवणाऱ्या टेक्‍निशियनवर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम 2011 च्या कायद्यानुसार अपराध व व "सारथी'मधील कलम 31, 32,33 व यातील कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. (The business of fake lab operators is booming as the prevalence of corona increases)

जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील लॅबचालक रुग्णांच्या जीवाशी खेळत असून, अशा बोगस लॅब चालकांवर कारवाई करावी, असा सूर जनतेतून उमटत आहे. सध्या कोरोनाच्या महामारीत राज्यभर संकट असून अनेक रुग्णांची भरमसाठ लूट केली जात आहे व योग्य उपचार मिळत नसल्यामुळे मृत्यूही होत आहे. तरी जिल्ह्यातील शहर व ग्रामीणमध्ये असे अनेक बोगस लॅबचालक असून बऱ्याच दिवसांपासून गोरख धंदा चालला आहे. त्यामुळे रुग्णांना त्रासास सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र पॅरा मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी नसेल तर लॅबचालकास व्यवसाय करता येत नाही, तसा कायदा अमलात आला.

Lab
सोलापूरच्या हक्काच्या पाण्यासाठी न्यायालयीन अन्‌ रस्त्यावरच्या लढाईचा निर्धार !

पीएमसी रजिस्ट्रेशन व महाराष्ट्र पॅरा वैद्यकीय परिषदेमध्ये समाविष्ट नसलेल्या मान्यताप्राप्त मेडिकल लॅबोरेटरी टेक्‍नॉलॉजी पदवी, पदविका नसताना अनेकजण राज्यात पॅथॉलॉजी क्‍लिनिकल, लॅबोरेटरीचे व्यवसाय करत तालुक्‍यातील अनेकांकडून अवास्तव शुल्क आकारत आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठाची व बोर्डाची शैक्षणिक पात्रता नसताना व्यवसाय उघडून बसले आहेत व रुग्णांच्या आरोग्याशी खेळत आहेत. राज्यात महाराष्ट्र पॅरा वैद्यकीय परिषद स्थापन झाले असून या परिषदेमध्ये योग्य शैक्षणिक अर्हताधारकांची नोंदणी केली जाते. परंतु जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांत शैक्षणिक पात्रता नसून तसेच नोंदणी करून न घेता अनधिकृत लॅबोरेटरीचा व्यवसाय केला जात आहे. तसेच वैद्यकीय व्यवसाय कमिशनपोटी अशा बोगस धारकास रुग्णांचे रक्त तपासणीसाठी पाठवले जात आहे व अशांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे रुग्णांना चुकीच्या उपचारांमुळे बळी पडावे लागत आहे.

Lab
पाकिस्तानबरोबरच्या दोन युद्धात सहभागी 89 वर्षीय योद्‌ध्याने जिंकली आता कोरोनाविरुद्धचीही लढाई !

प्रांताधिकारी, तहसीलदार, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन आदी पथकांनी याची तत्काळ दखल घेऊन महाराष्ट्र पॅरा वैद्यकीय परिषद कायदा 33 नुसार कारवाई करण्यात यावी. तसेच चालू असलेल्या लॅबचालकांचा गोरख धंदा बंद करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.

कोरोनाच्या संकटात बोगस लॅबचालक रुग्णांच्या जीवाशी खेळत असून, अमाप पैशाची लूट करीत आहेत, अशा तक्रारी आल्या असून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबत पत्र पाठवले आहे. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन कारवाई करावी.

- धनंजय कुलकर्णी, अध्यक्ष, महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषद, मुंबई

योग्य शैक्षणिक अर्हताधारक लॅब चालकांनी महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेकडे नोंदणी केली असेल तर त्यास व्यवसाय करता येतो. तसा कायदा अमलात आला. परंतु जिल्ह्यात अनेक बोगस लॅबचालक असून कोरोनाच्या संकटात कमिशनपोटी जनतेची अमाप लूट होत आहे. तरी बोगस लॅबवर प्रशासनाने कारवाई करून गुन्हा दाखल करावा.

- दावल इनामदार, सदस्य, महाराष्ट्र पॅरावैद्यकीय परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com