स्मार्ट सिटी योजनेला केंद्राकडून मुदतवाढ! सोलापूरला मिळाला दिलासा

स्मार्ट सिटी योजनेला केंद्राकडून मुदतवाढ! सोलापूरला मिळाला दिलासा
Summary

या मुदतवाढीमुळे सोलापुरात रखडलेल्या योजना मार्गी लागण्यासह प्रस्तावित योजना राबविण्यासंदर्भातील अडचणीही दूर होणार आहेत.

सोलापूर: केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेला सव्वा दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे सोलापूरसह देशातील 100 स्मार्ट सिटींना दिलासा मिळाला आहे. या मुदतवाढीमुळे सोलापुरात रखडलेल्या योजना मार्गी लागण्यासह प्रस्तावित योजना राबविण्यासंदर्भातील अडचणीही दूर होणार आहेत.

स्मार्ट सिटी योजनेला केंद्राकडून मुदतवाढ! सोलापूरला मिळाला दिलासा
सोलापूर जिल्ह्यात आठ महिन्यांत कोरोनाचे तीन हजार बळी

मुदतवाढीसंदर्भातील आदेश नुकतेच केंद्रीय नगरविकास खात्याकडून काढण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी योजनेमध्ये देशातील 100 तर महाराष्ट्रातील आठ शहरांचा समावेश आहे. या योजनेत सोलापूर हे देशात 34 व्या तर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. याआधीच्या धोरणानुसार स्मार्ट सिटी कामांच्या पूर्णत्वासाठी मार्च 2021 पर्यंत मुदत देण्यात आली होती. पण गत महिन्यात या योजनेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हीसीद्वारे बैठक घेऊन सर्व शहरांना या योजनांची कामे मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते, मात्र अधिकृतपणे मुदतवाढ दिली नव्हती. या पार्श्‍वभूमीवर केंद्राने या योजनेला दोन वर्षांची म्हणजे जून 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढ जरी दिली असली तरी कुठलाही अतिरिक्त निधी मिळणार नाही, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.

स्मार्ट सिटी योजनेला केंद्राकडून मुदतवाढ! सोलापूरला मिळाला दिलासा
सोलापूर विद्यापीठाच्या 'PET'चा बुधवारी निकाल ! 5 सप्टेंबरला मेरिट यादी

'समांतर'बाबत मिटली चिंता

मुदतवाढीचा सोलापूरला मोठा फायदा होणार आहे. सोलापुरात या योजनेंतर्गत आतापर्यंत 30 प्रकल्प पूर्ण झाले असून 16 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. चार प्रकल्प निविदास्तरावर, दोन प्रकल्प डीपीआर स्तरावर आहेत. समांतर जलवाहिनी योजनेसह अन्य प्रकल्पांना काही ना काही अडचणींमुळे दिरंगाई होत आहे. समांतर जलवाहिनीच्या भूसंपादनाचे काम रखडल्याने या योजनेला आणखीन दोन वर्षांचा विलंब होईल, असा अंदाज होता. त्यामुळे ही योजना रखडणार अशी भीती होती, मात्र मुदतवाढीमुळे यासंदर्भातील चिंता मिटली आहे.

स्मार्ट सिटी योजनेला केंद्राकडून मुदतवाढ! सोलापूरला मिळाला दिलासा
दक्षिण सोलापूर म्हणजे भाविकांसह पर्यटकांसाठी मोठी पर्वणी !

सोलापुरात योजनेसंदर्भातील स्थिती

सोलापुरात होम मैदान सुशोभिकरण, स्मार्ट रोड, स्मार्ट चौक, ऍडव्हेंचर पार्क, नाईट मार्केट, पार्क स्टेडिअम पुनर्विकासाचा पहिला टप्पा, कचरा ट्रान्सफर स्टेशन, 85 कि.मी.ची ड्रेनेज लाईन, 120 घंटागाड्या आदी योजना पूर्ण झाल्या आहेत. सध्या समांतर जलवाहिनी, 10.8 कि.मी.चा रस्ता, तीन गाव पाणीपुरवठा योजना, पाकणी येथे अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र, भवानी पेठेत वेस्ट वॉटरवर ट्रीटमेंट प्लॅन, पार्क स्टेडिअम पुनर्विकासाचा दुसरा टप्पा आदी योजनांचे काम सुरू आहेत तर 50 ई-बसेस, अग्निशमन दलासाठी अत्याधुनिक गाड्या व शिडी घेणे या योजना डीपीआरस्तरावर आहेत.

स्मार्ट सिटी योजनेला केंद्राकडून मुदतवाढ! सोलापूरला मिळाला दिलासा
पाहा आध्यात्मिक पर्यटनाची 'पंढरी' सोलापूर जिल्हा !

मुदतवाढीचा सोलापूरला फायद होणार आहे. समांतर जलवाहिनीचे काम गत दोन वर्षे भूसंपादनअभावी रखडलेले आहे. आता महापालिकेने आतातरी वेळेत भूसंपादन करुन दिल्यास आगामी दोन वर्षात योजना पूर्णत्वास येणे शक्‍य आहे.

- त्रिंबक ढेंगळे-पाटील, सीईओ, स्मार्ट सिटी कंपनी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com