esakal | तुळजापूरहून विवाहासाठी मुलगी निघाली सोलापूरकडे, आज विवाह होता, पण...
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage

तुळजापूर तालुक्‍यातील कुटुंबीयांनी नातेवाइकांच्या ओळखीने मोहोळ तालुक्‍यातील कुटुंबासोबत मुलीची सोयरीक जमविली होती.

तुळजापूरहून विवाहासाठी मुलगी निघाली सोलापूरकडे, आज विवाह होता, पण...

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : डोक्‍यावर वाढलेला खासगी कर्जाचा भार आणि घर सोडून गेलेले वडील, अशा कौटुंबिक परिस्थितीमुळे आपल्या भावाकडे राहायला असलेल्या आईने 15 वर्षीय मुलीचा विवाह उरकण्याचे नियोजन केले. तुळजापूर तालुक्‍यातील (Tuljapur) या कुटुंबीयांनी नातेवाइकांच्या ओळखीने मोहोळ तालुक्‍यातील कुटुंबासोबत सोयरीक जमविली. आज (ता. 22) सायंकाळी विवाह लावून देण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र, चाईल्ड लाइफच्या (Child Life) माध्यमातून या विवाहाची माहिती समजली आणि बालकल्याण समितीने (Child Welfare Committee) हा विवाह रोखला. (The Child Life and Child Welfare Committee has stopped child marriage in Solapur district)

हेही वाचा: ओसरतेय कोरोनाची लाट! आज शहरात 40, ग्रामीणमध्ये आढळले 1355 रुग्ण

कोरोनामुळे शाळा बंद असून मुलगी घरीच असते. मुलगी वयात आल्याने तिच्या आईने तिचा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या वडिलांना खासगी सावकारांचे कर्ज झाल्याने ते तीन-चार वर्षांपूर्वी घरातून निघून गेल्याची माहिती बालकल्याण समितीला समजली. मुलीची आई त्यांच्या भावाकडे रहायला आहे. मुलगी वयात आल्याने तिचा विवाह लावण्यासंदर्भात नातेवाइकांनी तिच्यासाठी मुलगा शोधला. मोहोळ तालुक्‍यातील एका शेतकरी कुटुंबातील तो मुलगा आहे. मुलीला चांगला पती मिळेल, तिला सुख मिळेल या हेतूने आईने मुलीचा विवाह ठरविला.

हेही वाचा: मुलांच्या हिमोग्लोबिनची तपासणी करा ! पालकमंत्र्यांचे निर्देश

चाईल्ड लाइफकडून बालकल्याण समितीला त्याची माहिती मिळाली. शनिवारी (ता. 22) सायंकाळी तो विवाह होणार होता. लॉकडाउनमुळे मुलगी व पालक विवाहाच्याच दिवशी दुपारी मोहोळमध्ये येणार होते. तत्पूर्वीच, सोलापूर बालकल्याण समितीच्या माहितीवरून उस्मानाबादच्या समितीला माहिती दिली. मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र सायकर, प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, संरक्षण अधिकारी श्रीमती कापसे, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी मोहोळ तालुक्‍यातील त्या मुलाच्या घरी भेट देऊन चौकशी केली. त्या वेळी विवाह असल्याचे त्या मुलाच्या पालकांनी कबूल केले. त्यांचे जबाब घेतले आणि त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.देऊन त्या मुलीसह पालकांना ताब्यात घेऊन बंदपत्र घेऊन सोडून देण्यात आले.

आर्थिक अडचणींमुळे वाढले बालविवाह

तुळजापूर तालुक्‍यातील मुलीचे वय 15 तर मोहोळ तालुक्‍यातील मुलाचे वय 21 होते, असे बालकल्याणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांचा विवाह आज (शनिवारी) सायंकाळी होता. दरम्यान, मजुरी करणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलींचे, पालक असुशिक्षित असलेल्या कुटुंबातील लहान मुलींचे विवाह लावून दिले जात असल्याचे निरीक्षणही बालकल्याण समितीने नोंदविले. तसेच मुलगी वयात आल्यानंतर मुलीच्या काळजीने विवाह उरकला जात आहे. पालक व्यसनी असल्याने येणारी मजुरी त्यातच खर्च होते. त्यामुळे मुलीचा विवाह साधेपणाने उरकण्यात येत असल्याचेही अनेकदा समोर आले आहे.

loading image