मुलांच्या हिमोग्लोबिनची तपासणी करा ! पालकमंत्र्यांचे निर्देश

मुलांच्या हिमोग्लोबिनची तपासणी करण्याचे पालकमंत्र्यांनी दिले आदेश
Datta Bharane
Datta BharaneEsakal
Summary

बालकांवरील उपचारासाठी सुविधायुक्‍त प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही ऑक्‍सिजन बेड उपलब्ध करून देण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी या वेळी दिली

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 18 वर्षांखालील 11 लाख 92 हजार मुलांची हिमोग्लोबिन (Hemoglobin) तपासणी करावी, असे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित यंत्रणांना दिले. दरम्यान, बालकांवरील उपचारासाठी सुविधायुक्‍त प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही ऑक्‍सिजन बेड उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. (Guardian Minister Dattatraya Bharane orders to check children's hemoglobin)

Datta Bharane
सोलापूर विद्यापीठाची जुलै व ऑगस्टमधील परीक्षाही ऑनलाइनच !

नियोजन भवन येथील कोरोनाविषयक आढावा बैठकीत श्री. भरणे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या वेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या 52 टीम कार्यरत असून त्यांच्याद्वारे गावोगावी लहान मुलांची तपासणी केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Datta Bharane
जिल्ह्यातील कोरोनाबाधित बालकांनी ओलांडला दहा हजारांचा टप्पा !

श्री. भरणे म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करा. सध्या ग्रामीण भागातील 13 तर शहरातील 16 रुग्णालये बालकांवरील उपचारासाठी अधिग्रहीत केली आहेत. ग्रामीणमधील रुग्णालयांमध्ये 240 तर शहरात 409 बेडची उपलब्धता असणार आहे. पालकांनी घाबरून न जाता मुलांचा आहार, स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, सलमान खान यांच्या बिईंग ह्यूमन संस्थेने 25 ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर दिली आहेत. जिल्ह्यातील व बाहेरील सामाजिक संस्था, उद्योगांकडून ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळविण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

कोरोनानंतर "म्युकरमायकोसिस'चा धोका

जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना अम्फोटिसिरीन-बी इंजेक्‍शनची कमतरता पडू दिली जाणार नाही. शासनाकडे अधिक इंजेक्‍शनची मागणी करावी. तसेच म्युकरमायकोसिस आजाराने जिह्यातील 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 120 रुग्ण उपचार घेत आहेत. तत्पूर्वी, या आजारातून 30 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचेही पालकमंत्र्यांनी आवर्जून सांगितले. त्यात चार रुग्ण कोरोना बाधित तर इतर रुग्णांना कोरोना नव्हता, असेही त्यांनी सांगितले. या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार घेता येतील, असेही ते म्हणाले. डॉ. ढेले यांनी म्युकरमायकोसिसवरील 349 इंजेक्‍शन आतापर्यंत मिळाल्याचे या वेळी स्पष्ट केले.

वाढीव बिलाच्या वाढल्या तक्रारी

ग्रामीणमधील रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी पोलिस यंत्रणेने पेट्रोलिंग व कारवाईत वाढ करावी. त्यासाठी साखर कारखाने, बाजार समित्यांची वाहने घ्यावीत. तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाने अतिरिक्त माल भरणाऱ्या जड वाहतुकीची तपासणी करण्यासाठी नाके वाढवावेत. तर वाढीव बिलांसंदर्भात अजूनही नागरिकांच्या तक्रारी येतच आहेत. नातेवाइकांना रुग्णालयांकडून पक्‍की बिले दिली जात नाहीत. प्रत्येक रुग्णालयाने शासकीय दरपत्रक लावलेले नाहीत. त्यावर जिल्हा प्रशासन व महापालिकेने लक्ष द्यावे, प्रसंगी कारवाई करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी या वेळी दिल्या. डॉक्‍टरांनी सामाजिक जाणिवेतून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com